बिबट्याने केली काळविटाची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 12:37 AM2018-01-28T00:37:14+5:302018-01-28T00:37:17+5:30

घनसावंगी तालुक्यातील रामसगाव शिवारात बिबट्याने काळविटाची शिकार केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला.

Leopard hunt blackbuck | बिबट्याने केली काळविटाची शिकार

बिबट्याने केली काळविटाची शिकार

googlenewsNext

तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील रामसगाव शिवारात बिबट्याने काळविटाची शिकार केल्याचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. वन विभागाच्या अधिका-यांनी पंचनामा केला. या भागात आठवडाभरापासून बिबट्याचा वावर असल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तीर्थपुरी परिसरात उसाच्या शेतांमध्ये पंधरा दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. गुरुवारी सायंकाळी गजानन खोजे, दत्ता खोजे या शेतक-यांनी बिबट्या उसाच्या एका शेतातून दुस-या शेतात जाताना पाहिला. जुनी रामसगाव शिवारातील रस्त्यालगत असलेल्या सुरेंद्र भालेकर यांच्या शेतात शेतकरी राजू पवार यांना शुक्रवारी एक काळवीट मृत अवस्थेत आढळून आले. शेतक-यांनी याबाबत वन विभागाच्या अधिका-यांना माहिती दिली. त्यानंतर वनपाल आर.एस. राठोड, वनसंरक्षक बी.के घोगटे, कर्मचारी डी.डी. शेख यांनी पंचनामा करून काळविटाची विल्हेवाट लावली. वनपाल राठोड म्हणाले, की मृत काळवीट चार वर्षांचा होता. या भागात बिबट्याचा वावर असल्याचे ठशांवरून दिसून येत आहे. उसाचे क्षेत्र जास्त असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी नेमका पिंजरा कुठे लावावा, ते ठरविणे अवघड आहे. परिसरातील शेतक-यांनी सावधानता बाळगावी.
----------
शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण
उसाच्या शेतामुळे बिबट्या लपण्यासाठी जागा मिळत आहे. शिवाय या भागात काळवीट व हरणांचे कळपही अधिक आहेत. मागील आठवड्यात एकलहरा येथील अण्णासाहेब चव्हाण यांच्या गोठ्यातील वासरू बिबट्याने ठार केले होते. त्यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण असून, मजुरांनी कामावर येणे बंद केले आहे.

Web Title: Leopard hunt blackbuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.