बिबट्याने केली मेंढीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 12:08 AM2018-02-08T00:08:26+5:302018-02-08T00:08:39+5:30

घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने रामसगाव शिवारात एका मेंढीची शिकार करीत तिला फस्त केले.

Leopard hunts sheep | बिबट्याने केली मेंढीची शिकार

बिबट्याने केली मेंढीची शिकार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
तीर्थपुरी : घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या गावांत बिबट्याने हैदोस घातला आहे. मंगळवारी मध्यरात्री बिबट्याने रामसगाव शिवारात एका मेंढीची शिकार करीत तिला फस्त केले.
बीड जिल्ह्यातील मेंढपाळ लक्ष्मण कळसकर हे गत दोन महिन्यांपासून रामसगाव परिसरात मेंढ्या चराईसाठी आलेले आहेत. शेतात दररोज वेगवेगळा मुक्काम करीत ते वास्तव्य करतात. त्या बदल्यात त्यांना ज्वारी व काही पैसे मोबदला मिळतो आणि मेंढ्याच्या चा-याची व्यवस्थाही होते. रामसगाव शिवारातील शिवाजी भालेकर यांच्या शेताजवळ मंगळवारी ते रात्री मुक्कामास होते.
बुधवारी सकाळी मेंढ्या चरण्यासाठी मोजदाद सुरू केली असता एक मेंढी आढळली नाही. त्यांनी शोध घेतला असता परिसरातच एक मेंढी मृत व अर्धवट अवस्थेत आढळून आली. बाजुला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसून आले.
दरम्यान, एकलहेरा येथे गाय-वासरू तर रामसगाव येथे काळविटाची बिबट्याने शिकार केल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच मंगळवारी ही घटना घडली. यामुळे पशुपालकांत दहशतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने मात्र अद्याप शोध मोहीम सुरू केली नसल्याचे समजते.

Web Title: Leopard hunts sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.