पालिकेकडून स्वच्छतेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:31 AM2018-01-11T00:31:31+5:302018-01-11T00:31:43+5:30

स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत.

Lessons for cleanliness from municipality | पालिकेकडून स्वच्छतेचे धडे

पालिकेकडून स्वच्छतेचे धडे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्वच्छ भारत आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जालना शहरात विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेत दररोज यासंदर्भात बैठका होत आहेत. पालिका प्रशासन आणि सृष्टी फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सौर ऊर्जेतून घनकच-याचे विघटन आणि व्यवस्थापन यावर कार्यशाळा घेण्यात येत आहे. यातून नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाणार आहे.
जालना शहरात अस्वच्छता पसरलेली असल्याने याची विल्हेवाट व्यवस्थित लागत नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. त्यातच केंद्र सरकारने स्वच्छ भारत हे अभियान हाती घेतले. त्यानंतर राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ करण्याच्या दिशेने हालचाली सुरु करीत विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात केली. स्वच्छतेसाठी पालिकेला १४ कोटींचा निधीही देण्यात आला आहे. यातून स्वच्छतेच्या साहित्यासह मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नेमण्यास सुरुवात करण्यात आली
पुणे येथील पर्यावरण अभ्यासक प्रा. चंद्रकांत गव्हाणे हे कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत. प्लास्टिक कच-याचे विनाधूर पर्यावरणमित्र पद्धतीने विघटन करणे, कच-यापासून जैविक खत निर्मिती, वाहनांतून निर्माण होणारा धूर वा धूळ शोषून घेणारे यंत्र यावर मार्गदर्शन होईल. एलसीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून कार्यशाळेत या विषयांवर माहिती दिली जाणार आहे.

Web Title: Lessons for cleanliness from municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.