पंधरा सावकारांना परवाना नूतनीकरणाचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:20 AM2021-06-23T04:20:34+5:302021-06-23T04:20:34+5:30
जालना शहरात जवळपास ६२ सावकर असून, अन्य तालुक्यातही सावकार आहेत. या सावकरांचा खरा लाभार्थी हा ग्रामीण भागातील गरीब मजूरवर्ग ...
जालना शहरात जवळपास ६२ सावकर असून, अन्य तालुक्यातही सावकार आहेत. या सावकरांचा खरा लाभार्थी हा ग्रामीण भागातील गरीब मजूरवर्ग आहे. ज्यांच्याकडे शेती आहे; परंतु ती कोरडवाहू आहे. विशेष करून पेरणीच्या वेळी खासगी सावकारांकडून पैसे घेऊन पेरणी करण्यावर शेतकऱ्यांचा भर असतो. शेतकऱ्यांनी सावकाराची पायरी चढू नये म्हणून सरकारने पीककर्ज हे अत्यल्प दरात उपलब्ध करून दिले आहे; परंतु काही शेतकऱ्यांकडे जुनी थकबाकी असल्याने त्यांना नवीन पीककर्ज मिळत नाही. त्यामुळे इच्छा नसतानाही गरिबांना सावकाराची पायरी चढावी लागते. या आधीदेखील काही मोजक्या सावकारांनी तारण ठेवून दिलेली रक्कम परत केल्यावरही त्यांच्या शेतीवर कब्जा करून ती स्वत:च्या नावावर करून घेण्याचे प्रकार घडले होते; परंतु जवळपास १६ पेक्षा अधिक सावकारांविरुद्ध अशा तक्रारी आल्यावर त्याची सुनावणीसह त्यांच्या घराची झडती घेऊन कागपत्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पैसे भरल्याचे सिद्ध झाल्यावर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या जमिनी परत करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चौकट
असे आहेत सावकारांचे दर
खासगी सावकरांचे दर शासनाने निश्चित करून दिले आहेत. त्यात नऊ टक्क्यांमध्ये शेतीसाठी कर्ज देताना काही तरी तारण ठेवले जाते. १२ टक्क्यांसाठी शेतीकर्ज हे विनातारण दिले जाते. १५ टक्क्यासाठी बिगर शेतीसाठी सोने, चांदी अथवा शेतजमीन तारण ठेवून कर्ज दिले जाते. तर १८ टक्के दराने कर्ज देताना बिगर शेती आणि कुठलीच वस्तू अथवा जमीन ही तारण न ठेवताही सावकार कर्ज देऊ शकतात.