पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Published: July 5, 2017 12:26 AM2017-07-05T00:26:00+5:302017-07-05T00:27:57+5:30
जालना: गळा दाबून पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी शेख अकबर शेख अख्तर यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी मंगळवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना: गळा दाबून पत्नीचा खून केल्याप्रकरणी आरोपी शेख अकबर शेख अख्तर यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी मंगळवारी जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली. परतूर शहरात एप्रिल २०१६ मध्ये ही घटना घडली होती.
या प्रकरणातील मृत रिहाना यांचा परतूर येथील शेख अकबर शेख अख्तर याच्याशी २०१४ मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी पत्नीच्या
चारित्र्यावर संशय घेऊन सतत मारहाण करायचा.
१५ एप्रिल २०१६ रोजी आरोपीने रात्री साडेनऊच्या सुमारास पत्नीचा हाताने गळा दाबून खून केला. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख अकबर यास अटक केली.
तपासाअंती न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. यात फिर्यादी अफसर खान पठाण, अमजद खान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल दीपक आडे, हेड कॉन्स्टेबल एम.पी.सुरडकर, डॉ. डी. आर. नवल, तपास अधिकारी के.के. शेख यांच्या साक्षी महत्त्वाच्या
ठरल्या.
प्रत्यक्षदर्शी व साक्षीदाराची साक्ष विचारात घेऊन अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.