लायन्सचा आरोग्य उपक्रम कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:01 AM2019-04-26T01:01:51+5:302019-04-26T01:02:56+5:30
लायन्स क्लब जालना गोल्ड, प्राईड, स्टील आणि रॅपिड मिशन या उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लायन्स क्लब जालना गोल्ड, प्राईड, स्टील आणि रॅपिड मिशन या उपक्रमांतर्गत आरोग्य क्षेत्रात डायलिसीसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा अनेक गरजू रुग्णांना मोठा लाभ होत आहे. ही बाब निश्चितच प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र बारवाले यांनी केले.
येथील ओम हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांसाठी सहा महिन्यांपूर्वी पहिली डायलिसीसची सुविधा लायन्स क्लबच्या वतीने सुरू केली होती. त्यात आणखी एका डायलिसीस मशीनची वाढ करण्यात आली आहे. या उपक्रमास बारवाले यांनी नुकतीच भेट देऊन आढावा घेतला. यावेळी विजय बगडिया यांनी या संदर्भातील माहिती दिली. यावेळी डॉ. रितेश अग्रवाल यांनीही डायलिसीसचे महत्त्व आणि त्याची गरज समजावून सांगितली. कार्यक्रमास प्रकाशचंद लड्डा, रामकुंवर अग्रवाल, विजय कागलीवाल, शरद जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. विजय दाड यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास रामकिसन गर्ग, राजेश कामड, किशोर गुप्ता यांचीही प्रमुख उपस्थिती होती. उद्योगपती महेंद्र भक्कड, अॅड. सतीश तवरावाला, सुभाष देविदान, ओंकार अग्रवाल, पवन सेठिया, साधना सेठिया, गीता गुप्ता, हरिकिशन मुंदडा, महावीर गिल्डा, सत्यनारायण मंत्री, संजय अग्रवाल, पुरूषोत्तम जयपुरिया, किशोर अग्रवाल, अरूण मित्तल, लक्ष्मीकांत कंकाळ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमात रमेश अग्रवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश कामड आणि अशोक हुरगट यांनी आभार मानले.