‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:39 AM2019-07-29T00:39:11+5:302019-07-29T00:39:34+5:30

समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले.

Lions' social work is inspirational | ‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

‘लायन्सचे’ समाजकार्य दीपस्तंभासारखे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : समाजसेवेच्या बाबतीत लॉयन्स क्लबचे कार्य दीपस्तंभासारखे आहे. जालना क्लबने या दीपस्तंभाप्रमाणे उपेक्षित समाजघटकांसाठी उल्लेखनीय काम करावे, असे प्रतिपादन माजी प्रांतपाल विजयकुमार बगडिया यांनी केले.
लॉयन्स क्लब आॅफ जालनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ मालदीव येथील हॉटेल पॅराडाईज रिसोर्ट येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रिजन चेअरपर्सन मनोहर खालापुरे तसेच जीएसटी. को -आॅर्डिनेटर पुरुषोत्तम जयपुरिया यांची प्रमुख उपस्थिती होती.
लॉयन्स क्लब आॅफ जालनाचे अध्यक्ष म्हणून लॉ. शामसुंदर लोया, सचिव म्हणून मिनाक्षी दाड, प्रथम उपाध्यक्ष म्हणून राजेश भुतिया, कोषाध्यक्षा म्हणून सोनाली जयपुरिया तसेच लॉयन्स क्लबच्या अध्यक्षा म्हणून प्रेमलता लोया, कोषाध्यक्ष म्हणून डॉ. माधुरी पाकणीकर यांनी यावेळी शपथ घेतली.
शामसुंदर लोया यांच्या कार्यकाळामध्ये लॉयन्स क्लब आॅफ जालनाने समाजकार्याचा नवा आदर्श प्रस्थापित करावा, अशी अपेक्षा पुरुषोत्तम जयपुरिया यांनी व्यक्त केली.
मनोहर खालापुरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. नेत्रसेवेचे कार्य लॉयन्स क्लब आॅफ जालनाने यावर्षभरात आणखी जोमाने करावे, असेही ते म्हणाले.
यावेळी समितीचे पदाधिकारी किशोर अग्रवाल, राजेश खिस्ते, हिंमत शिंदे, दिनेश लोहिया, अशोक कोटेचा, द्वारकादास मुंदडा, गणेश कामड, पांडूरंग सांगळे, डॉ. गिरीश पाकणीकर, डॉ. राजेंन्द्र करवा, डॉ. राजकुमार सचदेव, सुचिता जांगडा, स्मिता मित्तल, जयप्रकाश श्रीमाळी यांनीही शपथ घेतली.
सूत्रसंचालन जयप्रकाश श्रीमाळी यांनी तर मीनाक्षी दाड यांनी आभार मानले.

Web Title: Lions' social work is inspirational

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.