अंबड येथील साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:30 AM2021-03-10T04:30:57+5:302021-03-10T04:30:57+5:30

अशोक डोरले लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले ...

Literature at Ambad | अंबड येथील साहित्य

अंबड येथील साहित्य

Next

अशोक डोरले

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबड : मराठतील आद्य कवयित्री म्हणून महदंबा यांचे नाव मोठ्या आदराने साहित्य क्षेत्रात घेतले जाते. असे असले तरी या कवयित्रीच्या जन्मगावी त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात म्हणून एक भव्य स्मारक होऊन तेथे साहित्य उपक्रमांची रेलचेल सतत राहावी असा सूर मान्यवरांनी आळवला आहे. एकूणच या महदंबने जे साहित्य रचले आहे, त्याला आजही तोड नसून, महानुभाव पंथाच्या तत्व्नावरून चालतांना साधारपणे आठशे वर्षापूर्वी जालना जिल्ह्यात एवढी बुध्दीमान कवयित्री जन्माला आल्याने त्याचे सर्वत्र कौतूक आहे.

रामसगाव या गावाचं ऐतिहासिक महत्त्व आहे .अनेक लोककथा येथील जनतेने मोठ्या निष्ठेने जपलेल्या आहेत. येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी नदीवर लोकांच्या सोयीसाठी घाट बांधलेला आहे .

मराठी साहित्यातली पहिली कवयित्री महदंबा यांचे हे गाव. महदंबा यांच्या पतीच्या वंशजांकडे यादव राजाचे पौरोहित्य होते, असे म्हणतात. तसेच या गावात नरसिंहाचे देवस्थान ही आहे. येथे दरवर्षी नरसिंह जन्मोत्सव सोहळा साजरा होतो .

महदंबा यांचा कार्यकाळ हा . १२२८ ते १३०३ आद्य मराठी कवयित्री. महदायिसा ह्या नावानेही त्यांची ओळख आहे. महानुभाव पंथीय असून लीळाचरित्र, श्रीगोविंदप्रभुचरित्र, स्मृतिस्थळ आणि इतिहास ह्या महानुभावीय ग्रंथावरून त्यांचा काही चरित्रात्मक तपशील मिळतो. देवगिरीचा राजा महादेवराय यादव ह्याचे पुरोहित वामनचार्य ह्यांच्या कुळात महदंबेचा जन्म झाला. वामनाचायार्चा पुत्र महेश्वरपंडित ह्याला माधवभट आणि बायेनायेक असे दोन पुत्र होते. महदंबा ही बायेनायेक ह्याची कन्या. महानुभाव पंथीयांचे आद्य आचार्य नागदेवाचार्य माधवभटाचे पुत्र होत. म्हणजे नागदेवाचार्य व महदंबा ही चुलत भावंडे. महदंबेला बालपणीच वैधव्य आले. ती अत्यंत विरक्त आणि बुद्धिमान होती, असे महानुभाव पंथीय ग्रंथातील तिच्यासंबंधीचे उल्लेख पाहून वाटते.

महदंबेची ख्याती तिने रचिलेल्या ह्यधवळ्यांह्णवर (कृष्णरुक्मिणी-विवाहावर तिने रचिलेली गीते) मुख्यत: अधिष्ठित आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे ह्या धवळ्यांचे दोन भाग आहेत. साधी, सुंदर रचना हे ह्या धवळ्यांचे लक्षणीय वैशिष्ट्य. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंबेचा असून उत्तरार्धाच्या रचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या दोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध पूर्णत: महदंवेचा असून उत्तरार्धाच्या सचनेसाठी म्हाइंभट्ट आणि लक्ष्मीधरभट ह्या गोन महानुभाव पंडितांचे साहाय्य तिला झालेले दिसते. धवळ्यांचा पूर्वार्ध १२८७ च्या पूर्वी आणि उत्तरार्ध १३०३ च्या पूर्वी रचिला गेला असावा.

महदंबेच्या नावावर मातृकीरुक्मिणीस्वयंवर आणि गर्भकांड ओव्या अशा दोन रचनाही आहेत. कृष्णरुक्मिणीविवाह हाच मातृकीरुक्मिणीस्वयंवराचाही विषय. प्रत्येक ओवीच्या प्रारंभी एक अशा प्रकारे बावन्न मातृका ह्या काव्यात असल्यामुळे त्यास मातृकीरुक्मिणीस्वयंवर असे नाव आहे. ह्या काव्यातूनही धवळ्यांचे प्रतिसाद अपिरहार्यपणे उमटलेले आहेत. गर्भकांड ओव्या हे एक आध्यात्मिक प्रकरण आहे.----------

-----------------------------------------------------------------------------------------

.

महदंबा यांनी वास्तव मांडले.

श्री चक्रधर स्वामी यांच्या अत्यंत जवळच्या शिष्य .तत्कालीन सामाजिक जीवनाचं वास्तव चित्रण त्यांनी धवळ्यांमधून केलं .सहज उत्कट आविष्कार म्हणजे धवळे .लग्नातील गाणे व स्त्रीसुलभ भावना या मधून प्रकट झालेले आहेत .

.डॉ.प्रल्हाद लुलेकर,

प्रसिद्ध साहित्यिक.

रामसगाव येथे त्यांचे स्मारक व्हावे तसेच या गावाला कवितेचे गाव म्हणून दर्जा द्यावा अशी मागणी महदंबा,भूमीजन,भानुकवी, महानुभाव या चार संमेलनात झाली आहे. परंतु शासनाने अजून पर्यंत त्याची दखल घ्यावी .

भारतभूषण शास्त्री

महानूभव साहित्याचे अभ्यासक,

अंबड.

Web Title: Literature at Ambad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.