बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा : काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:31 AM2021-01-23T04:31:42+5:302021-01-23T04:31:42+5:30

परतूर शहरात आदर्श अर्बन को - ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने बचत गटांसाठी कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

Loans taken by self-help groups should be properly utilized: Black | बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा : काळे

बचत गटांनी घेतलेल्या कर्जाचा योग्य विनियोग करावा : काळे

googlenewsNext

परतूर शहरात आदर्श अर्बन को - ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वतीने बचत गटांसाठी कर्ज वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन ज्ञानेश्वर काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती रामप्रसाद थोरात, अर्जुन थोरात, एकनाथ खुळे, अविनाश राठोड, एकनाथ रासवे, रमेश चव्हाण, कैलाश राठोड, बाबासाहेब चौरे यांची उपस्थिती होती. यावेळी चेअरमन काळे म्हणाले, आम्ही महिला बचत गटांना लाखो रुपयांचा पतपुरवठा करून या गटाचे सक्षमीकरण करत आहोत. गटाच्या सदस्यांनी योग्य व्यवसाय निवडून योग्य गुंतवणूक करून नफा कमवावा, याबरोबरच घेतलेल्या कर्जाची वेळेत परतफेडही करावी. दरम्यान, जयभवानी या महिला बचत गटास कर्ज पुरवठा करण्यात आला. यावेळी जीवन चव्हाण, स्वप्नील अंभुरे, उद्धव गुंजाळ, परमेश्वर बर्वे यांच्यासह महिला बचत गटातील सदस्यांची उपस्थिती होती.

दिनदर्शिकेचे लोकार्पण

परतूर शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत आदर्श अर्बन पतसंस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक विष्णू कदम, लिंगनवाड, बाबासाहेब तरवटे, भास्कर उगले, याम सोनी, अंजली कोळकर, शिवम नाईकनवरे, स्वप्नील अंभुरे, सय्यद वाहेद्दीन आदींची उपस्थिती होती.

फोटो ओळ : आदर्श अर्बन क्रेडिट सोसायटीकडून महिला बचत गटास पतपुरवठा करण्यात आला. यावेळी धनादेश देताना चेअरमन ज्ञानेश्वर काळे, रामप्रसाद थोरात, शिवम नाईकनवरे, भास्कर उगले, स्वप्नील अंभुरे आदी उपस्थित होते.

Web Title: Loans taken by self-help groups should be properly utilized: Black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.