स्थानिक गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 01:02 AM2018-08-17T01:02:00+5:302018-08-17T01:02:12+5:30

स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून दोन संशयित आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली आहे.

Local crime branch raids | स्थानिक गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका

स्थानिक गुन्हे शाखेचा कारवाईचा धडाका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून दोन संशयित आरोपींना गुरूवारी अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून घरफोडी प्रकरणातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह तीन जीप जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली.
पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शखाली ही कारवाई करण्यात आली. या आरोपींनी सुखापुरी, पिठोरी सिरसगाव, वडीगोद्री या परिसरात केलेल्या घरफोडी प्रकरणातील दगिने तसेच रोख रक्कम लांबविली होती. या चोरी प्रकरणातील आरोपींची माहिती मिळाल्यावर गौर व त्यांच्या सहका-यांनी सापाळ लावून संतोष ओंकार गायकवाड, रा. तलवाडा, ता. गेवराई आणि फकीरचंद विश्वनाथ माळी रा. शेंदूरवदा ता गंगापूर यांना अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यांची कबूली दिली. चोरी, घरफोडी केल्यावर पळून जाण्यासाठी दुचाकीसह चारचाकींची देखील हे व त्यांचे सहकारी करत असल्याचे सांगितले. या पकडलेल्या आरोपींकडून तीन जीप हस्तगत केल्या आहेत. या जीपसह एकूण १५ लाख ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केल्याचे गौर यांनी सांगितले.
ही कारवाई यशस्वी करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जयसिंग परदेशी, कैलास कुरेवाड, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, प्रशांत देशमुख, रामेश्वर बधाटे, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, समाधान तेलंग्रे, सागर बाविस्कर, सचिन चौधरी, विलास चेके, विष्णू कोरडे, संदीप मांटे, वसंत राठोड, सूरज साठे, ज्योती खरात यांनी प्रयत्न केले.

Web Title: Local crime branch raids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.