जालना जिल्ह्यात घरकुलासाठी सर्वसामान्यांची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:49 AM2018-09-22T00:49:21+5:302018-09-22T00:50:32+5:30
प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
गणेश पंडित ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी सर्वसामान्यांकडून पैसे उकळण्यासाठी परिसरात दलालाची टोळी सक्रिय आहे. गोरगरीब नागरिकांकडून पैसे लुबाडण्याचे प्रकार सुरू असून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्व नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे, सर्वसामान्यांना स्वस्तात घर घेता यावे, यासाठी केंद्रशासनाने २०१७ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरु केलेली आहे. अनेकांना याचा चांगला लाभ होत आहे. मात्र शासनाने सुरु केलेल्या या चांगल्या योजनेला खिळ लावण्याचे काम सध्या सुरु आहे. विशेष म्हणजे कुठल्याच कागदाची मागणी प्रशासनाकडून नाही. मात्र असे असतांना परिसरात तुम्हाला पक्के घर मिळवून देतो, असे सांगून दलाल सर्वसामान्याकडून प्रत्येकी पाच हजार रूपयांची मागणी करत आहेत. यामुळे नागरिकांची फसवून होत आहे.
विशेष म्हणजे हे गेल्या दीड वर्षापासून दलाला सक्रिय असतांना याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकात संताप आहे. सध्या ग्रामिण भागात घरकुलासाठी परिसरात सर्वे सुरु आहे.याचाच फायदा दलालांनी घेणे सुरु केले आहे. तुम्हाला तत्काळ घर मिळवून देता असे म्हणत पैशाची मागणी करत आहेत.सर्वे करतेवेळी कोणत्याही प्रकाराच्या कागदपत्राची मागणी केल्या जात नाही.
केदारखेडा : लाभार्थ्यांनी अमिषाला बळी पडू नये
याविषयी गटविकास अधिकारी अरुण चौलवार यांनी सांगितले. प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची चाचपणी करण्यात येत आहे. लाभार्थ्यांची घराची परिस्थितीचे फोटो अपलोड करण्याचे सांगितले आहे. कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही. सर्वेच्या नावाखाली कोणी लाभार्थ्यांची आर्थिक लूट करीत असल्यास लाभार्थ्यांनी मला सांगावे. आमिषाला बळी पडू असे आवाहन चौलवार यांनी केले. शिवाय ग्रा.प. ला प्रविष्ट केलेल्या यादीनुसार हा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. यात कोणी लाभार्थी वंचीत राहणार नाही,याची दखल घेतली जात आहे.