मोसंबी उत्पादकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 01:07 AM2019-04-18T01:07:18+5:302019-04-18T01:08:22+5:30

जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे.

Loss of cottage manufacturers | मोसंबी उत्पादकांचे नुकसान

मोसंबी उत्पादकांचे नुकसान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
रामनगर : जालना तालुक्यातील बहुतांश गावात मोसंबी आंबे बहराची फळगळ मोठ्या प्रमणात झाली आहे. यामुळे मोसंबी उत्पादनात मोठी घट होणार असून मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील फळधारणाक्षम मोसंबी अवघी साडेतीन हजार हेक्टरच्या आसपास आहे. खरीपाचा समजला जाणारा आंबे बहरावर यावर्षी दुष्काळाचे मोठे संकट होते. यामुळे मोठ्या प्रयत्नाने डिसेंबर- जानेवारी महिन्यात शेतकऱ्यांनी हजारो रूपये खर्च करून मोसंबी आंबे बहराची फूट काढून अतिशय काळजी घेत झाडावर फळधारणा केली. परंतु, मार्च- एप्रिल महिन्यात बदलत्या वातावरणामुळे बोरा एवढ्या आकाराच्या मोसंबीच्या फळांची बहुतांश बागांमध्ये गळ झाली आहे.
तालुक्यात फळपिकांमध्ये एकमेव मोसंबी हे असे फळपीक आहे की, इतर फळपिकांच्या तुलनेत सोपे आहे. द्राक्ष, डाळींब यापेक्षाही मोसंबी चांगली म्हणणारा शेतकरी वर्ग आजही आहे. जालना जिल्ह्यात मोसंबीसाठी असणारे अनुकूल वातावरण वर्षानुवर्ष बदलत चालले असल्याचे आंबा उत्पादक सांगतात. गेल्या सात- आठ वर्षापासून सातत्याने पडणा-या दुष्काळामुळे मोसंबी उत्पादकांच्या हाती एरव्ही फार काही लागले नाही. प्रत्येक वर्षी तोच पाढा यावर्षी काहीही होवो; झाडे वाचली म्हणजे झालं. अशी झाडं वाचविता- वाचविता अनेकांच्या बागा नष्ट झाल्या. एकेकाळी तालुक्यात १० हेक्टरच्या आसपास मोसंबी होती. आता ती अवघी तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर आली. एरव्ही वृक्ष लागवडीसाठी शासनस्तरावरून लाखो रूपये खर्च केले जातात. २० ते २५ वर्ष मोसंबी वृक्षाचे जतन करणा-या उत्पादकाला काय, असा सवालही मोसंबी उत्पादकांमधून विचारला जात आहे. तालुक्यातील फळगळतीची पाहणी करून फळपीक विमा तातडीने द्यावा, अशी मागणीही मोसंबी उत्पादकांमधून होत आहे.
मोसंबीचा जिल्हा म्हणून जालन्याची महाराष्ट्रात ओळख आहे. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्ह्यातील मोसंबी खºया अर्थाने शाश्वत उत्पन्न देणारी ठरावी, यासाठी संबंधित विभागाकडून कुठल्याच ठोस उपाय- योजना केल्या जात नसल्याचे मोसंबी उत्पादक संघाचे अध्यक्ष भगवान डोंगरे यांनी सांगितले.
निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे कृषी विभागाकडे मोसंबी उत्पादकांच्या समस्या सोडविण्यास सध्या तरी पुरता वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी पडलेल्या दुष्काळामुळे आंबे बहराच्या मोसंबीचे जतन करणे, जिकिरीचे होतेच. परंतु, पुढील वर्षी या मोसंबीस ३० ते ४० हजार रूपये प्रति टन भाव मिळणारच, असे खुद्द व्यापा-यांसह मोसंबी उत्पादक सांगत आहेत.

Web Title: Loss of cottage manufacturers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.