निम्न दुधनाच्या पाणी पातळीत होतेय घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:28 AM2021-01-22T04:28:18+5:302021-01-22T04:28:18+5:30

८८ टक्के जिवंत पाणीसाठा : दोन कालव्यांतून विसर्ग सुरू परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून ...

Lower milk water level decreases | निम्न दुधनाच्या पाणी पातळीत होतेय घट

निम्न दुधनाच्या पाणी पातळीत होतेय घट

googlenewsNext

८८ टक्के जिवंत पाणीसाठा : दोन कालव्यांतून विसर्ग सुरू

परतूर : तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातील कालव्याद्वारे मागील काही दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू असून, प्रकल्पातील पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. सध्या धरणात ८८.१३ टक्के जिवंत पाणीसाठा आहे.

परतूर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारा निम्न दुधना प्रकल्प गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने १०० टक्के भरला होता. आता उन्हाळा तोंडावर आला असल्याने पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनाचाही भार या प्रकल्पातील पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या प्रकल्पात मुबलक पाणी असले तरी येणारे दिवस कसे असतील हे सांगणे कठीण आहे. पाण्याचा विनाकारण व अवैध उपसा यावर काही प्रमाणात निर्बंध असणे आवश्यकच असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. सध्या धरणात २४२.२००६ दलघमी पाणीसाठा आहे. म्हणजे जिवंत पाणीसाठा ८८.१३ टक्के आहे. मागील दहा ते बारा दिवसांपासून धरणाच्या खालील रब्बी पिकांना कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे. ही पाण्याची दुसरी पाळी आहे. यात डाव्या कालव्यातून १०१ क्युसेक तर उजव्या कालव्यातून ०१० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी २६ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या धरणावर परतूर, सेलू मंठा यासह इतर गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे भविष्यात धरणातील पाण्याचा वापर काटकसरीनेच करणे गरजेचे आहे.

चौकट

गतवर्षी निम्न दुधना प्रकल्प १०० टक्के भरल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी धरणाच्या बॅक वॉटरवरून पाइपलाइन करून उसासह इतर बागायती पिके घेतली आहेत. धरणातील पाणी पातळी घटली की, बॅक वॉटरमध्येही घट होते. दरम्यान, पाणी अटल्यास शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च करून केलेल्या पाइपलाइनचा काहीच उपयोग होत नाही. एकूणच वाढत असलेले बागायती क्षेत्र व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात निर्माण होऊ नये, यासाठी धरणातील पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे.

Web Title: Lower milk water level decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.