महाभारत म्हणजे तत्कालीन समाज जीवनाचा आरसा : डॉ. क्रांती व्यवहारे यांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:33 AM2021-03-09T04:33:35+5:302021-03-09T04:33:35+5:30
अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने महाभारतातील स्त्रिया या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ...
अंबड तालुक्यातील दहीपुरी येथील महानुभाव साहित्य व शैक्षणिक प्रतिष्ठानच्या वतीने महाभारतातील स्त्रिया या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यवहारे म्हणाल्या की, द्रौपदी ही नीती शास्त्रज्ञ होती. कन्या शुल्क प्रथा, सती प्रथा तसेच कुटुंबाची जबाबदारी त्या काळातातील स्त्रियांनी चांगल्या प्रकारे निभावलेली आहे. महाभारत हे तत्कालीन समाजव्यवस्थेचा आरसा होते. शिक्षणाचा संस्कार, विधवा, पुनर्विवाह, वैवाहिक जीवनामध्ये स्त्रिला मानाचे स्थान होते, असेही त्यांनी सांगितले.
चौकट
महानुभाव साहित्य प्रतिष्ठान, अंबडतर्फे "सन्मान कर्तृत्त्वाचा जागर स्त्री शक्तिचा" या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात २१ विषयांवर २१ दिवस २१ महिला विविध धर्म, संप्रदायातील भारतीय स्त्रियांच्या कर्तृत्त्वाचा इतिहास मांडणार आहेत. यामध्ये डॉ. क्रांती व्यवहारे, डॉ. विशाखा कांबळे, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. विद्या दिवटे, डॉ. नंदा पुरी, डॉ. विजया राऊत, डॉ. कोमल कुंदप, डॉ. वैशाली गोस्वामी, डॉ. संगीता घुगे, विजया ब्राम्हणकर, डॉ. शोभा रोकडे, डॉ. मंजुषा सावरकर, डॉ. मारियम सय्यद, केशर मेश्राम, डॉ. वर्षा चौरे, डॉ. सुशीला सोलापुरे यांचा सहभाग आहे.
===Photopath===
080321\08jan_18_08032021_15.jpg
===Caption===
जालना