महादेव जानकरांनी छगन भुजबळांना व्यासपीठावरच केली विनंती; म्हणाले, 'साहेब स्वत: पक्ष....'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 05:31 PM2023-11-17T17:31:13+5:302023-11-17T17:32:46+5:30
आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते.
जालना- आज ओबीसी समाजाने जालना येथे मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी महादेव जानकर यांनी व्यासपीठावरुन मंत्री छगन भुजबळ यांना एक विनंती केली, या विनंतीनंतर समोर बसलेल्या गर्दींने घोषणा सुरू केल्या.
जालन्यात ७० पोलीस पाय घसरून पडले का?; पोलीस लाठीचार्जवर छगन भुजबळांचा मोठा दावा
आमदार महादेव जानकर म्हणाले, 'ओबीसी का राज करेगा, देशपर राज आयेगा', जोपर्यंत ओबीसीचा स्वत:चा पक्ष होत नाही. तोपर्यंत अर्थ राहणार नाही. काँग्रेसचा आणि भाजपचे लोक येतील आणि तुम्हाला लुटून घेऊन जातील, भुजबळ साहेब माझी तुम्हाला विनंती आहे, वेगळा पक्ष काढा. स्वत:च्या पक्षात उभं राहा, अशी विनंती जानकर यांनी केली. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या लोकांनी एकच घोषणाबाजी सुरू केली.
'हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो'
मंत्री भुजबळ म्हणाले, हा छगन भुजबळ स्वकष्टाचं खातो. तुझ्यासारखं सारसऱ्याच्या घरी तुकडा मोडत नाही, असा टोला भुजबळ यांनी जरांगे पाटील यांना लगावला. आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण देऊ नये. 56 मराठा मोर्चे निघाले पण आम्ही कुणाला विरोध केला. मात्र आम्ही कुणाचं घरं, दारं जाळली नाहीत, असंही भुजबळ म्हणाले.
यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. छगन भुजबळ म्हणाले, पोलिसांचा लाठिचार्ज सगळ्यांनी पाहिला आहे. सत्तर महिला पोलिसांसहीत दगडांचा मार खाऊन रुग्णालयात दाखल झाले. त्यांची तब्येत बिघडली म्हणून पोलिसांनी त्यांना रुग्णालयात जाण्यासाठी विनंती केली. पण, यांनी अगोदरच तयारी केली होती. त्या पोलिसांना त्यांनी अचानक दगडांचा मारा केला. पोलिस काय पाय घसरुन पडले का? असा टोलाही भुजबळ यांनी लगावला.