सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 05:24 AM2024-11-02T05:24:08+5:302024-11-02T05:29:10+5:30

Maharashtra Assembly Election 2024 : इच्छुकांना तातडीने बैठक घेण्याची सूचना

Maharashtra Assembly Election 2024 : Everyone should decide on one candidate: Manoj Jarange Patil | सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील

सर्वांनी मिळून एकच उमेदवार ठरवावा : मनोज जरांगे पाटील

Maharashtra Assembly Election 2024 : वडीगोद्री (जि. जालना) : विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक व उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मराठा बांधवांनी तातडीने एकत्र बसून बैठक घ्यावी. या बैठकीत मिळून एक उमेदवार ठरवावा. आपल्यासाठी ही चांगली संधी आहे. ओढाताणीच्या नादात ही संधी घालवू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी केले. 

राखीव मतदारसंघात दलित समाजाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला जाणार आहे. इतर ठिकाणी मराठा समाजाचे उमेदवार असतील. इतर छोट्यामोठ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेणार असल्याचे जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

समरजीत घाटगे यांनी घेतली भेट
अंतरवाली सराटीमध्ये समरजीत घाटगे यांनी जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. घाटगे कागल मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2024 : Everyone should decide on one candidate: Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.