मनोज जरांगे-पाटील यांच्या निर्णयाचे नेत्यांना टेन्शन
By विजय मुंडे | Published: November 1, 2024 10:38 AM2024-11-01T10:38:22+5:302024-11-01T10:39:10+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : जालना : एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील भाऊबीजेच्या मुहूर्तावर कुठे कोणता उमेदवार द्यायाचा हा निर्णय जाहीर करणार आहेत. तर दुसरीकडे मविआ आणि महायुतीतील नाराजांनी बंडाचे निशाण हाती घेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या सर्वच उमेदवारांसह नेत्यांचेही टेन्शन वाढले आहे.
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांतील प्रमुख लढती या महायुती विरुद्ध मविआतील उमेदवारांत होणार आहे. ‘वंचित’नेही भाेकरदन वगळता चार मतदारसंघांत उमेदवार दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत मनोज जरांगे-पाटील यांचा फॅक्टरही चालला होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयावरही निवडणुकीतील विजयाची गणिते ठरणार आहेत.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
मराठा, ओबीसी आरक्षण आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
या आरक्षण आंदोलनाचा मुद्दा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा राहणार आहे.
जालना वगळता इतर ठिकाणी मतदारसंघात उद्योगांचा अभाव असून, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न आहे.
शेती, सिंचनाचा अभाव, शेतमालाचा हमीभाव यासह इतर मुद्दे विरोधकांकडून उचलले जात आहेत.
सत्ताधाऱ्यांकडून मात्र गत सत्ताकाळात राबविलेली विकासकामे, शासकीय योजनांवर भर दिला जात आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकींचा असा हाेता निकाल...
विधानसभा मतदारसंघ मतदान विद्यमान आमदार पक्ष मिळालेली मते
परतूर ५२% बबनराव लोणीकर भाजप १,०६,३२१
घनसावंगी ४७% राजेश टोपे राष्ट्रवादी १,०७,८४९
जालना ४९% कैलास गोरंट्याल काँग्रेस ०,९१,८३५
बदनापूर ४९% नारायण कुचे भाजप १,०५,३१२
भोकरदन ५४% संतोष दानवे भाजप १,१८,५३९