मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2024 05:29 AM2024-11-13T05:29:29+5:302024-11-13T05:31:00+5:30

भाजपचे उमेदवार आ. बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाची कांड्यांशी तुलना करणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversial statement of BJP Babanrao Lonikar on The votes of the Maratha community | मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी आहेत मतं; भाजपच्या बबनराव लोणीकरांचे वादग्रस्त वक्तव्य

लोकमत न्यूज नेटवर्क, परतूर (जि. जालना) : मराठा समाजाची कांड्यांवर मोजण्याइतकी मतं आहेत, असे वक्तव्य भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी आष्टी (ता. परतूर) येथील प्रचारसभेत केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आमदार लोणीकर आष्टी येथील सभेत म्हणाले, या गावात अठरापगड जातींचे लोक आहेत; मात्र मराठा समाजाची मते कांड्यावर मोजण्याएवढी आहेत. सर्व समाजांतील लोक माझ्यासोबत आहेत. जातींचा व आडनावांचा उल्लेख करून चाळीस वर्षांपासून हा सर्व समाज माझ्यासोबत असल्याचे ते म्हणाले.

आगीत तेल ओतल्याची चर्चा; टीका भोवणार?
अगोदरच मराठा आरक्षण आंदोलन टोकाचे पेटलेले असल्याने व मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका सर्वांना माहीत असताना, भाजपचे उमेदवार आ. बबनराव लोणीकरांनी मराठा समाजाची कांड्यांशी तुलना करणे म्हणजे आगीत तेल ओतल्यासारखेच असल्याचे बोलले जात आहे.  आमदार लोणीकरांना मराठा समाजाची कांड्यांशी तुलना करणे भोवणार असल्याची चर्चाही रंगली आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Controversial statement of BJP Babanrao Lonikar on The votes of the Maratha community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.