Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 06:07 PM2019-10-12T18:07:44+5:302019-10-12T18:09:43+5:30

एकतर्फी लढत चुरशीची होणार 

Maharashtra Election 2019: Fight between older contestants in Badanapura | Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

Maharashtra Election 2019 : बदनापुरातून जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणूक रिंगणात 

Next
ठळक मुद्दे१४ उमेदवार मैदानात 

- दिलीप सारडा

बदनापूर विधानसभा मतदारसंघात युती व आघाडीच्यावतीने जुनेच प्रतिस्पर्धी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. एकतर्फी वाटणारी ही निवडणूक चुरशीची होणार असल्यामुळे यावेळेस बदनापूरचा गड कोण जिंकतो ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. 

गत निवडणुकीत युती व आघाडी नव्हती. त्यामुळे मतदारसंघाचे चित्र वेगळे होते. यावेळी युती व आघाडी झाली आहे. यामुळे यावेळची परिस्थिती बदली आहे. त्यातच मतदारसंघात वंचित, अपक्ष व मनसेने आपले उमेदवार उभा केल्याने युती व आघाडीच्या संकटात भर पडली आहे.  हे उमेदवारही आपले अस्तित्व दाखविण्यासाठी प्रचाराचा जोर वाढवित आहेत़ 

या निवडणुकीत आ. नारायण कुचे (भाजपा), बबलू चौधरी (राष्ट्रवादी), राजन मगरे (वंचित बहुजन आघाडी), राजेंद्र भोसले (मनसे) यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवारआ. नारायण कुचे हे आपल्या काळातील विकास कामांच्या जोरावर मते मागत असून, याच मतदारसंघातून दोन वेळेस विधानसभा निवडणूक लढलेले आघाडीचे बबलू चौधरी पुन्हा संधी देण्याची विनंती मतदारराजाकडे करीत आहेत. 

दुसरीकडे वंचितचे राजेंद्र मगरे, मनसेचे राजेंद्र भोसले, अपक्ष डॉ. अश्विनी गायकवाड यांनी सुध्दा मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिल्यामुळे सुरूवातीला सोपी वाटणारी निवडणूक मतविभाजनाच्या आकडेवारीत फसली असल्याने या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, या मतदारसंघात मुख्य लढत भाजपचे उमेदवार आ. नारायण कुचे व राष्ट्रवादीचे उमेदवार बबलू चौधरी यांच्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत बदनापूरचा गड रोखल्या जातो की, पुन्हा ताब्यात घेतला जातो हे गुपित येणाऱ्या काळात उलगडणार आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न
- ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणाऱ्या सर्व योजना नियोजनाभावी बंद पडल्या. त्यामुळे पाणीटंचाईचा प्रश्न बिकट होत आहे. शेतीसाठी मुबलक सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे बागायती शेतीला पाणी न मिळाल्याने शेतकरी आर्थिक विवचनेत सापडला आहे़ याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- बदनापूर शहरात कायम स्वरूपी पाणीपुरवठा योजना नसल्यामुळे आजही महिन्याला पाणीपुरवठा होत आहे. नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागते. बसस्थानक नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे राहावे लागते.
- मतदारसंघात बेरोजगार व मजुरांना काम नसल्यामुळे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर. या मतदारसंघात औद्योगिक वसाहत, मोठ-मोठे उद्योग उभारलेले नाही़ बेरोजगार तरूणांची संख्या जास्त. दर्जेदार सेवेअभावी शिक्षण, आरोग्याचे प्रश्न कायम. ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली दुरुवस्था.

प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची जमेची बाजू
आ. नारायण कुचे (भाजप)
- ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी संपर्कठेवल्यामुळे कार्यकर्त्यांची मोठी फळी. 
- सत्ताधारी असल्यामुळे ग्रामीण, शहरी भागात मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणून विकास कामे केली.
- ग्रामपंचायतींवर भाजपचा ताबा

बबलु चौधरी (राष्ट्रवादी)
- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क. 
- राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी झाल्यामुळे दोन्ही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचारात.
- राष्ट्रवादीच्या आमदाराने केलेली विकास कामे. या त्यांच्या जमेच्या बाजू आहे.

राजेंद्र मगरे  (वंचित)
- सरपंच म्हणून बदनापूरात केलेली विकास कामे. शहरातील प्रश्नांची माहिती व मोठा जनसंपर्क.
- मतदारसंघात ज्येष्ठ नेते प्रकाश आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग.
- विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मतदारांशी संपर्क.

राजेंद्र भोसले (मनसे)
- शिवसेनेत काम केल्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व जनतेशी संपर्क़
- अंबड येथील असल्यामुळे तालुक्यातील मतांचा फायदा. 
- राज ठाकरे यांना मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात.
- गावागावात मनसेचे कार्यकर्ते.

2०14चे चित्र
नारायण कुचे (विजयी, भाजप)
बबलु चौधरी (पराभूत, राष्ट्रवादी काँग्रेस )

 

Web Title: Maharashtra Election 2019: Fight between older contestants in Badanapura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.