सहायक लेखापाल निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 12:46 AM2018-11-21T00:46:46+5:302018-11-21T00:47:10+5:30

जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले

Mahavitaran accountant Suspended | सहायक लेखापाल निलंबित

सहायक लेखापाल निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथील वीज वितरण कंपनीच्या मस्तगड कार्यालयात अनोखा आणि चौकशी अधिकाऱ्यांनाही अचंबित करणार घोटाळा करण्यात आला आहे. या घोटाळ्याची पाळमुळे शोधून काढताना चौकशी अधिकारी हैराण झाले आहेत. या प्रकरणी मंगळवारी सहायक लेखापाल मायानंद अडचिने यांना निलंबित केले असून, यापूर्वी वरिष्ठ लिपिक पंकज सरदेशपांडे यांना निलंबित केले आहे.
जालना येथील वीज वितरण कंपनीतील अधिकारी आणि कर्मचा-यांनी संगणमत करून धनादेशाच्या माध्यमातून घोटाळ्याचे प्रकरण लोकमतने उघडकीस आणले होते. त्या नंतर या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश मुख्य अभियंता शरद गणेशकर यांनी दिले आहेत. यात आऊटसोर्सीग एजंसीच्या माध्यमातून वीजबिल वसुली करताना जे धनादेश घेण्यात आले, ते वेळेत न भरता न वटलेल्या धनादेशाचा हिशोबही नीट न ठेवल्याचे दिसून आले. या प्रकरणी लोकमत मधून वृत्त प्रसिध्द होताच या प्रकरणाने वीज वितरणमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणात मंगळवारी सहायक लेखापाल अडचिने यांना निलंबित केले असून, प्रारंभी पंकज सरदेशपांडे यांना प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने यापूर्वीच निंबित केल्याचे अधीक्षक अभियंता हुमणे म्हणाले.
जालना शहराचा प्रभारी पदभार असलेल्या कनिष्ठ अभियंत्यावरही या घोटाळ्यात संशयाची सुई फिरत आहे. त्यामुळे सध्या औद्योगिक वसहातीचा पदभार असलेल्या एक कनिष्ठ अभियंता हे प्रकरण उघडकीस आल्यापासून फरारी असल्याचे सांगण्यात आले. संबंधित अभियंत्याच्या घरी चौकशी समितीचे सदस्य जाऊन आले असता, ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mahavitaran accountant Suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.