‘मैत्रेय’मध्ये ३७५ जणांचे सव्वा कोटी अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2019 12:59 AM2019-12-14T00:59:03+5:302019-12-14T01:01:04+5:30

विविध योजनांचे अमिष दाखवून ३७४ गुंतवणूकदारांची सव्वा कोटी रूपयांची ‘मैत्रेय’ फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

In Maitreya, 1.25 crores trapped | ‘मैत्रेय’मध्ये ३७५ जणांचे सव्वा कोटी अडकले

‘मैत्रेय’मध्ये ३७५ जणांचे सव्वा कोटी अडकले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विविध योजनांचे अमिष दाखवून ३७४ गुंतवणूकदारांची सव्वा कोटी रूपयांची ‘मैत्रेय’ फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडे दिवसेंदिवस गुंतवणूकदारांच्या तक्रारी वाढत असून, फसवणुकीची आकडेवारी कोटीची उड्डाणे घेण्याची शक्यता आहे. या प्रकरणात आजवर केवळ दोन आरोपींना अटक झाली असून, इतर मात्र, अद्यापही फरारच आहेत.
शहरासह जिल्हाभरातील सर्वसामान्यांना मैत्रेय कन्स्ट्रक्शन, मैत्रेय ग्रुप, मैत्रेय प्लॉटर्स, सुवर्ण सिध्दी, मैत्रेय सर्व्हिसेस अशा विविध कंपन्यांच्या नावाखाली गुंतवणुकीच्या विविध योजना आणि त्यापोटी मिळणाऱ्या लाभाचे आमिष दाखविण्यात आले. साप्ताहिक, त्रैमासिक, सहामाही वार्षिक अशा पध्दतीने हप्त्यांचे संकलन करण्यात येत होते. त्यामुळे अनेकांनी काहीतरी लाभ होईल, या आशेवर थोडी- थोडी रक्कम विविध योजनांमध्ये गुंतविली. शहरासह जिल्हाभरातील शेकडो गुंतवणूकदारांनी कोट्यवधी रूपयांची गुंतवणूक विविध योजनांमध्ये केली आहे. मात्र, गुंतवणुकीनंतर परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शरद वाघमारे यांनी सदरबाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार सदरबाजार पोलीस ठाण्यात ११ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मैत्रेय ग्रुपच्या विविध योजनांमध्ये फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविण्यास सुरूवात केली होती. या प्रकरणात आजवर तब्बल ३७४ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. यात संबंधितांचे जवळपास १ कोटी १४ लाख २६ हजार ६०५ रूपये असल्याची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. गुंतवणूकदारांची संख्या दिवसेंंदिवस वाढत असून, फसवणूक झालेली रक्कमही वाढणार असल्याचे चित्र आहे. या प्रकरणात आजवर पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली होती. तर इतर आरोपी अद्यापही फरार आहेत. गुंतवणूकदारांनी माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
शुभकल्याण मल्टीस्टेट को. आॅप. सोसायटीतील फसवणूक प्रकरणात दाखल गुन्ह्यात पाच जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी नोंदविल्या आहेत. संबंधितांनी जवळपास १० लाख ४० हजार रूपयांची गुंतवणूक केली होती. शुभकल्याणच्या जालना, घनसावंगी व अंबड येथे शाखा होत्या. या प्रकरणाचा तपासही आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

Web Title: In Maitreya, 1.25 crores trapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.