योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी व्यापक प्रयत्न करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:32 AM2021-09-25T04:32:13+5:302021-09-25T04:32:13+5:30
जालना : कामगार, श्रमिक, गोरगरीब व सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसह विम्याचे कवच देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- श्रम व ...
जालना : कामगार, श्रमिक, गोरगरीब व सर्वसामान्यांना आरोग्य सुविधांसह विम्याचे कवच देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई- श्रम व आयुष्य मान भारत या महत्त्वाकांक्षी योजनांतून सुरक्षितता बहाल केली आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यापक प्रयत्न करावेत, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भास्कर दानवे यांनी केले.
भाजपा द.भा. आघाडी सेलचे शहराध्यक्ष गणेश जल्लेवार यांच्या वतीने आयोजित सेवा सप्ताहाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला. यावेळी आयोजित कार्डवाटप कार्यक्रमात दानवे बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, सिद्धिविनायक मुळे, माजी नगरसेविका सखुबाई पनबिसरे, प्रा. राजेंद्र भोसले, राजू बिकानेर, गणेश जल्लेवार, तुषार जल्लेवार यांची प्रमुख उपस्थिती होती. दानवे म्हणाले, सामाजिक दायित्वातून जल्लेवार हे नेहमीच गरजवंतांच्या मदतीसाठी सेवा कार्य करत आहेत. त्यांचे उपक्रम सर्वसामान्यांना दिलासा देणारे असल्याचेही ते म्हणाले. यावेळी राजेश राऊत, गणेश जल्लावार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालोमन घोरपडे यांनी तर तुषार जल्लेवार यांनी आभार मानले. यावेळी बालकिशन गुल्लापेल्ली, विनोद गड्डम, किशन चिंतल, रवी अलगोंडा,जेकब निर्मल, राजकुमार जल्लेवार, रवी आठवले, सार्थक जल्लेवार, उत्तमराव पटूलवार, सुभाष रायपुरे, अजय जाफ्राबादी, लतीफ तांबोळी, शेख हबीब यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
फोटो