जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

By विजय मुंडे  | Published: October 29, 2023 01:01 PM2023-10-29T13:01:25+5:302023-10-29T13:02:51+5:30

मी बोलतोय तोपर्यंत चर्चेला या, आरक्षण द्यायचं की नाही ते सांगा

Manoj Jarange Patal's health deteriorated; An important appeal has been made to the government for maratha reservation | जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

जरांगे पाटलांची प्रकृती खालावली; सरकारला केलंय महत्त्वाचं आवाहन

विजय मुंडे

अंतरवाली सराटी (जि.जालना) : मराठा आरक्षणासाठी अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती रविवारी चांगलीच खालावली आहे. जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच उपचार घेण्यास नकार दिला आहे. मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या, आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा, असेही जरांगे पाटील म्हणाले.

महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी प्रवर्गातून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या आमरण उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस. पाचव्या दिवशी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली दिसून आली. जरांगे पाटील यांनी अन्न-पाण्याचा त्याग केल्याने त्यांना निटसे बोलताही येत नव्हते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक रविवारीही तपासणी, उपचारासाठी दाखल झाले होते. परंतु, जरांगे पाटील यांनी तपासणी करण्यास, उपचार घेण्यास नकार दिला. जरांगे पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. मराठा बांधवांनी एकजूट व्हावे. फुटू देऊ नये. महाराष्ट्रात जिथे, जिथे साखळी उपोषण आहे तिथे आमरण उपोषणाला सुरुवात करावी. प्रत्येक पोलिस ठाण्यात परवानगीचा अर्ज द्यावा. जेणेकरून सरकारला किती ठिकाणी उपोषण सुरू आहे हे समजेल. उग्र आंदोलन करू नका, आत्महत्या करू नका, असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले. सरकारकडून अद्याप संवाद साधण्यात आला नाही. प्रश्नांची उत्तरेही मिळाली नाहीत. आम्ही त्यांच्याकडून उत्तर घेवू. मला बोलायला त्रास होतोय. मी जास्त बोलू शकत नाही.

Web Title: Manoj Jarange Patal's health deteriorated; An important appeal has been made to the government for maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.