मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 11:21 IST2024-12-28T11:19:51+5:302024-12-28T11:21:31+5:30

तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का?

manoj jarange patil allegations chief minister is supporting the accused in beed case | मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालताहेत, आरोपीला सांभाळायचं काम सुरू आहे: मनोज जरांगे

लोकमत न्यूज नेटवर्क, वडीगोद्री: मुख्यमंत्री तुम्ही तोंडघाशी पडणार, तुम्ही ज्यांना वाचवतात त्यामुळे तुम्ही तंगडी वर करून पडताल मुख्यमंत्री मराठे तुमच्या विरोधात जातील मुख्यमंत्री आरोपीला पाठीशी घालत आहेत,आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करत आहेत असा आरोपही मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसयांच्यावर केला.बीड येथे मोर्चाला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत प्रसार माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिला आहे.

बीड जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मोर्चा आहे संतोष भैया देशमुख यांच्या लेकिन हाक दिली आहे.बीड जिल्ह्यातील सर्व बांधवांना आणि जनतेने आणि सगळे मराठ्यांना विनंती आहे एकाने पण घरी थांबू नये. सरकारला या मोर्चामुळे जाग येईल. नाही आली तर आम्ही त्यांना आणणार कुणाचं पण बापाला येऊ द्या मॅटर मात्र मी दबु देणार नाही. जे जसे एकमेकांचे राजकारण काढत आहे त्याच्या विरोधात समाज जाईल यात राजकारण करू नये, मग महायुती किंवा महविकास आघाडी यांनी राजकारण करू नये लाजा वाटू द्या तुमच्या दोघांमुळेच हाल होऊ लागले आहे मग कसा आघाडी आणि महायुती मुळे.
काही मंत्री आहेत काही विरोधी पक्षातले आहेत विरोधी आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोप करणं बंद करा.

संतोष देशमुख यांचा खून झालाय, याच राजकारण कोणीही करू नका, मोर्चात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सहभागी व्हा.मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणात हलगर्जी पणा नाही केला पाहिजे, जातीयवाद पसरेल असं काम करू नका, जातीयवाद कसा नष्ट होईल यासाठी काम करा असे आवाहनही जरांगे यांनी केले. आज बीड चा मोर्चा शांततेत होणार, आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांनी मोर्चे काढा.मोर्चाची एक तारीख होणार नाही याची काळजी घ्या.जर सरकारने आरोपींना नाही धरलं तर मराठे तपास हातात धरणार.

तुम्ही नुसतं म्हणतात आम्ही आरोपीला सोडणार नाही, अरे आरोपीला धरणार केव्हा??हा मोर्चा जनतेचा आहे, कोणाच्या नेतृत्वात नाही मी कोणतंच मॅटर दाबू देणार नाही तुम्ही गुंड चळवळीने राज्य चालवायचं ठरवलं आहे का?आम्ही तुमची गुंडगिरी मोडून काढू शकतो
मुख्यमंत्री तुम्ही ॲक्शन मोडवर या असेही जरांगे म्हणाले.

Web Title: manoj jarange patil allegations chief minister is supporting the accused in beed case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.