मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली; वैद्यकीय पथक दोनदा येऊन आल्या पावली माघारी
By विजय मुंडे | Published: October 30, 2023 12:46 PM2023-10-30T12:46:33+5:302023-10-30T12:48:07+5:30
मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे यांना केले उपचार घेण्याचे आवाहन
वडीगोद्री ( जालना) : मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे. आज सकाळी दोनदा वैद्यकीय पथक तपासणी व उपचार देण्यासाठी दाखल झाले. पथकाने विनंती केली असता, तुम्ही खाली व्हा असं म्हणत जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
सरसकट कुणबी प्रमाणपत्र असे आरक्षण मिळाल्याशिवाय उपचार घेणार नसल्याचे मनोज जरांगे यांच्याकडून वारंवार सांगण्यात येत आहे. आरक्षण हाच माझा उपचार यावर ते ठाम असून ते उपचार घेण्या नकार देत आहेत. दरम्यान, आज दुपारी उपसमितीची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेतून जरांगे यांनी स्वतःची काळजी घेत उपचार घेण्याचे आवाहन केले. तसेच नवीन पुरावे पुढे येत आहेत, शिंदे समितीला आणखी वेळ लागणार आहे. सरकारला आणखी वेळ देण्यात यावा असेही शिंदे म्हणाले.