मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडली; उपचार सुरू, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:45 AM2024-10-30T11:45:48+5:302024-10-30T11:46:28+5:30
३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ याची घोषणा मनोज जरांगे करणार आहेत
- पवन पवार
वडीगोद्री (जालना) : मनोज जरांगे पाटील यांची अचानक तब्येत बिघडली असून अंतरवाली सराटीत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जरांगे यांची तब्येत बिघडल्याने त्यांना गावा जवळील सरपंच यांच्या मळ्यातील घरात सलाईन लावण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.
मनोज जरांगे यांना काल रात्रीपासून ताप होती. तसेच अशक्तपणा जाणवत आहे. त्यामुळे आज सकाळी त्यांना लावण्यात आली. तसेच रक्त तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे, अशी माहिती डॉक्टर चावरे यांनी दिली आहे.
३१ तारखेला अंतिम बैठक
येत्या ३० तारखेला होणारी अंतिम बैठक ही ३१ तारखेला होणार आहे. एक प्रकारे ते चांगले झाले आहे. ३० तारखेला छाननी आहे. कोणाचे अर्ज बाद होतात, कोणाची राहतात हे कळेल. उमेदवारीविषयी अधिकृत बैठक ही ३० ऑक्टोबरला बैठक रोजी होणार आहे. याबैठकीला मुस्लीम धर्मगुरू, बौद्ध भीक्खू येणार आहेत. असे मनोज जरांगे यांनी सांगितले. ३१ तारखेनंतर कोणता उमेदवार आणि कोणता मतदारसंघ हे अंतिम करणार आहे.