शरद पवार यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ मंठा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:43 AM2019-09-27T00:43:49+5:302019-09-27T00:44:09+5:30
शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / मंठा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध जाणीवपूर्वक राजकीय सूडबुद्धीने ईडीतर्फे गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी मंठा शहर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला प्रतिसाद मिळाला. तसेच जालना, देऊळगाव राजा, आष्टीसह जिल्हाभरातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवित निवेदने दिली.
जालना येथे जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नंदकिशोर जांगडे यांच्यासह तय्यब देशमुख, राजेंद्र जाधव, जयंतराजे भोसले, मिर्झा अन्वर बेग, मोहन क्षीरसागर, जहीर बागवान, मनोज देवरे, कुणाल क्षीरसागर, ज्ञानेश्वर धानुरे, फिरोज कुरेशी आदींची उपस्थिती होती.
मंठा येथील फाट्यावर गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे गोपाळराव बोराडे, काँग्रेसचे प्रदेश सचिव राजेश राठोड, भाऊसाहेब गोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष योगेश अवचार, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश घुले, उपनगराध्यक्ष सिराजखान पठाण, राजेश खंदारे, सोनाबापू बोराडे, विष्णूपंत बोराडे, अंकुश वायाळ, कबीर तांबोळी, अच्युत बोराडे व कार्यकर्त्यांनी फेरी काढून घोषणाबाजी केली. बंदमध्ये येथील व्यापाऱ्यांनी सहभाग नोंदविला. फेरीचा छत्रपती शिवाजी महाराज चौकात समारोप झाला.
आष्टी येथेही बंद पाळण्यात आला. सपोनि एस.बी.सानप यांच्या मार्फत शासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गावातून रली काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी बळीराम कडपे, रमेशराव सोळंके, कपिल आकात, नितीन जेथलिया, भगवान थोरात, सादेक जहागीरदार, विक्रम तौर, उत्तम पवार, गौतम शेळके, मनोज सोळंके, ओंकार काटे, राजेभाऊ आघाव, सत्तार कुरेशी, मंजुळदास सोळंके, लक्ष्मण सोळंके, शिवाजी सोळंके यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
देऊळगाव राजा येथे बंद
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव राजा येथेही राष्ट्रवादीच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. या बंदमध्ये व्यापा-यांनी सहभाग नोंदविला. यावेळी तुकाराम खांडेभराड, जिल्हा उपाध्यक्ष गंगाधर जाधव, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, कविश जिंतूरकर, जिल्हा प्रवक्ते अर्पित मिनासे, तालुकाध्यक्ष राजीव शिरसाट, नगरसेवक विष्णू रामाने, गजानन पवार, राजेंद्र खांडेभराड, गणेश सवडे, रामू खांडेभराड, दत्ता काळे, धनू मोहिते, दिनकर जाधव आदींनी सहभाग नोंदविला.