खंडित वीजपुरवठ्यामुळे मंठेकर त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:35+5:302021-08-02T04:11:35+5:30
मंठा शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. यामुळे ...
मंठा शहरासह तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून, याकडे महावितरणचे अधिकारी, कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वर्षानुवर्षे जीर्ण झालेल्या विद्युत तारा, उघडे किटकॅट, वाकलेले विजेचे खांब, आकडे टाकून घेतलेले कनेक्शन याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात पाऊस झाल्यास विद्युतपुरवठा बंद होतो. गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणचा हा भोंगळ कारभार सुरू आहे. विशेष म्हणजे, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहक हेल्पलाइनवर कॉल करतात. तेव्हा हा नंबर बंद करून ठेवला जात आहे. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किसन मोरे यांनी केली आहे.