मंठेकरांची धकधूक वाढली : पुन्हा कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:11 AM2021-08-02T04:11:23+5:302021-08-02T04:11:23+5:30
मागील दीड वर्षांपासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची रुग्ण संख्या मध्यंतरी कमी झाली. शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल केले होते. ...
मागील दीड वर्षांपासून धुमाकूळ घातलेल्या कोरोनाची रुग्ण संख्या मध्यंतरी कमी झाली. शासनाने लागू केलेले निर्बंध शिथिल केले होते. निर्बंध शिथिल झाल्याने पुन्हा बाजारपेठा खुल्या होऊन सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले होते. बाजारपेठांमध्ये पुन्हा गर्दी वाढ लागली होती. व्यापाऱ्यांमध्ये ही उत्साहाचे वातावरण होते. मंठा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु, आता कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. मागील चार दिवसात चार रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच शासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तालुक्यात कोरोनाचे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना टेस्ट वाढविल्या आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करावे. विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहन नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सतीश कुलकर्णी व पोलीस निरीक्षक यशवंत बागुल यांनी केले आहे.