मोलकरणींना अनेक दरवाजे बंद : कुटुंबाचा गाडा चालणार तरी कसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:30 AM2021-04-16T04:30:20+5:302021-04-16T04:30:20+5:30

मोलमजुरी करणारी एक महिला कमीत कमी ३ ते ४ घरची कामे करत असते. तिच्या घरचेही कामानिमित्त इतर ठिकाणी जात ...

Many doors closed to the maids: how can the family cart run | मोलकरणींना अनेक दरवाजे बंद : कुटुंबाचा गाडा चालणार तरी कसा

मोलकरणींना अनेक दरवाजे बंद : कुटुंबाचा गाडा चालणार तरी कसा

googlenewsNext

मोलमजुरी करणारी एक महिला कमीत कमी ३ ते ४ घरची कामे करत असते. तिच्या घरचेही कामानिमित्त इतर ठिकाणी जात असतात. त्यामुळे तिच्या संपर्कात दररोज येणाऱ्या व्यक्ती पाहून तिच्यापासून आपल्याला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती बहुतांश गृहिणींना वाटते. त्यामुळे एकवेळ कामाचा ताण पडला तरी चालेल. पण, मोलकरणींच्या माध्यमातून येणारा कोरोना नको, असे म्हणत बऱ्याच गृहिणी मोलकरणींना कामावरून कमी करत आहेत. आम्हाला कामासाठी इतरांच्या घरात जाताना आमच्या जीवाची भीती वाटते. ज्यांना अजिबातच काम होत नाही, जे वृध्द आहेत, असेच लोक आम्हाला याही दिवसांमध्ये कामाला बोलावतात, असे एका मोलकरणीने सांगितले.

एका घरातून मिळतात ४०० ते ५०० रुपये

जालना शहरातील बहुसंख्य वस्त्यांमध्ये भांडी, धुणे, झाडू-फरशी या सगळ्या कामांसाठी प्रत्येकी ५०० रुपये एवढा दर आकारला जातो. काही ठिकाणी हे दर ६०० रुपये प्रतिकाम एवढेही असतात. अनेक घरांमध्ये धुणे- भांडी आणि झाडू - फरशी अशा सगळ्याच कामासाठी मोलकरीण असते. काही घरांमध्ये केवळ भांडी घासण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे एका मोलकरणीला एका घरातून कमीत - कमी ५०० रुपये महिना तरी मिळत असतो.

माझा पती कामगार आहे. परंतु, आता लॉकडाऊन लागल्याने त्यांचे कामही बंद पडले. त्यातच आता मलाही काम मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे घर कसे चालवयाचे, हा प्रश्न पडला आहे. मुला - बाळांचे पोट कसे भरायचे, असा प्रश्न पडला आहे. शासनाने आम्हाला मदत करावी, असे एका मोलकरणीने सांगितले आहे.

कोरोनामुळे तीन ते चार घरांची कामे सुटली आहेत. त्यातच आता शासनाने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या घरांची कामेही जाण्याची भीती आहे. त्यामुळे पोट कसे भरावे, असा प्रश्न पडला आहे, असे एका महिलेने सांगितले.

घर कसे चालवायचे, याचीच चिंता

पुन्हा एका लॉकडाऊन लागले आहे. त्यामुळे आता बरीच कामे बंद होणार आहेत. त्यामुळे उत्पन्नही थांबणार आहे. मग घर कसे चालवायचे, असा प्रश्न बहुसंख्य मोलकरणींना पडला आहे. ज्या घरी या महिला एकट्याच कमावत्या आहेत किंवा ज्यांचे पती व्यसनी आहेत, अशा महिलांची चिंता तर अधिकच वाढलेली आहे.

Web Title: Many doors closed to the maids: how can the family cart run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.