जालना जिल्ह्यातील अनेक गावे तहानलेली; टँकर बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 01:02 AM2019-09-07T01:02:19+5:302019-09-07T01:02:38+5:30
नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : पावसाळ््याचे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र, भोकरदन तालुका सोडता इतर तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे भरपावसाळ््यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासनाने बदनापूर तालुका सोडता, इतरही तालुक्यातील टँकर बंद केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
गत काही वर्षांपासून मराठवाड्यात सतत दुष्काळ पडत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्ह्यातील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. गतवर्षीही जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. परिणामी, शेतकऱ्यांनी लागवड केलेली पिके करपून गेली होती. यात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबरोबरच जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत होते. अशा परिस्थितीत प्रशासनाच्या वतीने गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. दिवसेंदिवस पाणीटंचाई वाढत असल्याने टँकरच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत होती. यावर्षी टँकरने ६०० चा पल्ला गाठला होता. यावरुनच गतवर्षीच्या पाणीटंचाईची भीषणता दिसून येते.
त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडेल, अशी आशा शेतकºयांना होती. पावसाळ््याच्या सुरुवातीलच पावसाने हजेरीही लावली. शेतकºयांनी याच पावसाच्या भरोशावर लागवड केली. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडले होते. दरम्यान, भोकरदन तालुक्यातील काही भागात याच काळात दमदार पाऊस झाला. मात्र, जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, नदी, नाल्या, तलावांमध्ये पाणीच आले नाही. विहिरी बोअर कोरडेठाक असल्यामुळे भरपावसाळ््यात टँकरची संख्या ४०० जवळपास होती. परंतु, काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. परिणामी, टँकरची संख्या झपाट्याने कमी झाली. सध्या बदनापूर तालुक्यात ३८ टँकरने पाणीपुरवठा होत आहे. तर परतूर तालुक्यातील एका गावाला एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
टँकर बंद झाल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे टँकर पुन्हा सुरु करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
संताप : ३९ विहिरींचे अधिग्रहण; वाढीव उपाययोजनांची गरज
बदनापूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी ३९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. या विहिरींमधून टँकरद्वारे गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो.