मराठा महासंघाची जालन्यात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:38 AM2018-10-13T00:38:36+5:302018-10-13T00:39:29+5:30

गेल्या आठवडाभरापासून जालना शहर व जिल्ह्यात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याने ऐन नवरात्र उत्सवात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुक्रवारी दुपारी येथील वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर भागातील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात तोडफोड करून खूर्चाची फेकाफेक करण्यात आली.

The Maratha federations broke down in Jalna | मराठा महासंघाची जालन्यात तोडफोड

मराठा महासंघाची जालन्यात तोडफोड

googlenewsNext
ठळक मुद्देभारनियमनाविरुद्ध आंदोलन : खुर्च्यांची फेकाफेक अन् घोषणाबाजीने कार्यालय दणाणले

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्या आठवडाभरापासून जालना शहर व जिल्ह्यात सहा तासाचे भारनियमन सुरू केल्याने ऐन नवरात्र उत्सवात मोठी अडचण निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाकडून शुक्रवारी दुपारी येथील वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर भागातील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात तोडफोड करून खूर्चाची फेकाफेक करण्यात आली. या तोडफोडीनंतर आंदोलकांनी अधीक्षक अभियंत्याच्या खूर्चीला हार घालून निषेध नोंदविला.
ऐन नवरात्र उत्सवात वीज वितरण कंपनीने कोळशाचा अपुऱ्या पुरवठ्याचे कारण देत भारनिमयन सुरू केले होते. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून, नवरात्रात सकाळी अनेक महिला भाविक या शहरातील दुर्गा देवी, तसेच मळ्यातील तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जातात. असे असताना यापूर्वीच जालना शहरातील पथदिवे हे गेल्या काही वर्षांपासून बंद आहेत. त्यातच पुन्हा हे भारनिमयन सुरू झाल्याने जालना शहर हे काळोखात डुबते. यामुळे हे भारनिमयन रद्द करावे म्हणून आम्ही यापूर्वीच निवेदन दिले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख तसेच त्यांच्या अन्य सहकाºयांनी शुक्रवारी अधीक्षक कार्यालयाला आपले टार्गेट बनवले.
ज्यावेळी हे कार्यकर्ते वीज वितरण कंपनीच्या कन्हैयानगर मधील कार्यालयात गेले असता, तेथे अधीक्षक अभियंता उपस्थित नव्हते. त्यामुळे त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात जाऊन खूर्चांची तोडफोड केली. त्या नंतर अधीक्षक अभियंत्यांची खूर्ची ही टेबलवर ठेवून त्या खूर्चीला हार घालून कंदील भेट देण्यात आला.
या अनोख्या आंदोलनाने कार्यायात एकच गोंधळ उडाला होता.
जालना : आमच्या सणांनाच का भारनियमन
एरव्ही कुठलेही सण अथवा काही कार्यक्रम असतील तर काहीही करून २४ तास वीजपुरवठा सुरळीत ठेवला जाऊन विशेष काळजी घेतली जाते. मग आता सर्वात महत्त्वाचा उत्सव सुरू असतानाच कोळशाचे निमित्त करून भारनिमयनाचे भूत आमच्या माथी का मारता असा सवाल यावेळी करण्यात आला. तसेच हे भारनिमयन रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Web Title: The Maratha federations broke down in Jalna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.