मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 11:54 AM2024-07-23T11:54:35+5:302024-07-23T11:54:54+5:30

बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस, मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली असून उपचाराची गरज असल्याची माहिती वैद्यकीय पथकाने दिली

Maratha leaders are not aware of the state of society, will hold everyone accountable: Manoj Jarange | मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

मराठा नेत्यांना समाजाच्या परिस्थितीची जाणीव नाही, सगळ्यांचा हिशोब करणार: मनोज जरांगे

- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) :
मला असं वाटतं छगन भुजबळ आणि त्यांच रक्त एक झालं वाटतं. कारण छगन भुजबळ यांची सुद्धा भाषा तशीच होती. फक्त माझ उपोषण संपू द्या, मी सगळ्यांचा हिशोब घेतो असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रवीण दरेकर यांना दिला. बेमुदत उपोषणाचा आजचा चौथा दिवस असून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. उपोषणस्थळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे पुढे म्हणाले, माझ्या समाजासाठी मी उपोषण करतोय आणि माझ्या शरीराला काय त्रास होतोय याची जाणीव मराठ्यांच्या नेत्याला नाहीये. त्यांना हेच माहित नाही की उपोषण केल्याने काय हाल होतात आणि आरक्षण नसल्यामुळे आमच्या समाजाचे हाल होत आहेत. परत एकदा सांगतो उपोषण संपू द्या ते जे जे काही बोलले त्या सगळ्यांचा हिशोब घेणार. 

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे कौतुक
मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे खरंच कौतुक करतो. मी इथून मागे सुद्धा सांगत होतो की मराठ्यांना आरक्षण देऊ शकतात ते फक्त एकनाथ शिंदे साहेबच. फक्त आरक्षण लवकर द्या, उशीर करू नका. समाजाच्या हाल झाल्यानंतर देऊ नका. प्रमाणपत्रांसाठी मुदत वाढ देत असताना एसीबीसी कुणबी आणि ईडब्ल्यूएस हे तीनही ऑप्शन खुले ठेवा, म्हणजे मराठ्याचे पोरग मागे राहणार नाही. तसेच तिन्ही गॅजेट लागू कर, ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या मराठ्यांना म्हणजे मागील त्या मराठ्यांना प्रमाणपत्र द्यायचं हे मार्गी लावा, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले. 

पवार- मुख्यमंत्री भेटीवर...
शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मात्र त्यांच्या भेटीदरम्यान काय झालं हे मला सांगता येणार नाही. नेमकी त्यांची भेट कशासाठी झाली हेच मला माहित नाही. आरक्षणासाठी जर झाली असती तर बातमी बाहेर आली असती.

सरकारचा प्रतिनिधी कोणी आले नाही तरी मला काही वाटत नाही आणि आम्ही त्यांना बोलवतही नसतो. ते नाही आले तरी आमचं काम मराठ्यांसाठी लढणे हेच आहे. आपण समाजासाठी लढत राहायचं यायचं की नाही तो त्यांचा प्रश्न. स्वतःचे  तुंबडे भरून घेणारे लोक आम्ही नाहीत. अशी टीका सरकार वर केली. तसेच मराठा आणि कुणबी एकच आहे हे सिद्ध करायला एवढे दिवस लागत नाही. एका ओळीचा शासन निर्णय करायला एवढा वेळ लागत असतो का? असा सवाल सर्वपक्षी बैठकीवर मनोज जरांगे पाटील यांनी केला.

जरांगे यांची प्रकृती खालावली
मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगे यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथक आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आरोग्य तपासणी दरम्यान त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज आहे, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Maratha leaders are not aware of the state of society, will hold everyone accountable: Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.