सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 06:58 PM2023-10-31T18:58:49+5:302023-10-31T19:00:52+5:30

'मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ.'

Maratha Reservation: Govt's decision not acceptable, will not accept partial certificate; Jarange Patil's clarify | सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

सरकारचा निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र वाटू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा इशारा

जालना- आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत न्यायमूर्ती शिंदे समितीचा प्रथम अहवाल स्वीकारण्यात आला. कुणबी नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरू करण्यास मंत्रिमंडळात मंजुरी दिली आहे. पण, मनोज जरांगे(पाटील) यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणार नाही. रात्रीपर्यंत निर्णय घ्या अन्यथा मी जलत्याग करेन, असे जरांगे पाटील यांचे म्हणने आहे.

माध्यमाशी संवाद साधताना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणीचा पुनरुच्चार केला. सरकारने विशेष अधिवेशन बोलावून यासंदर्भात निर्णय घ्यावा. अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये, तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत. उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

मराठा बांधवांनो संयम राखा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन; उद्धव ठाकरेंवरही पलटवार

मराठा तरुणावर खोटे गुन्हे दाखल करू नका, महाराष्ट्र शांत आहे, सरकारचे लोक गोंधळ घालत आहेत. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाऊन एसपी, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसेन. त्यावेळी 5 लाख येतील, अथवा 10 लाख आंदोलक येतील, मला त्याची काळजी नाही. लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला आंदोलन करु द्या, नाहीतर उद्या मी स्वत: तुमच्याकडे पाहिल्याशिवाय राहणार नाही. मराठे काय असतील हे तुम्हाला मग कळेल. मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास जशासतसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Maratha Reservation: Govt's decision not acceptable, will not accept partial certificate; Jarange Patil's clarify

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.