आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 07:34 PM2023-12-01T19:34:03+5:302023-12-01T19:34:21+5:30

'सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा करू नये.'

maratha reservation, manoj jarange, No retreat without reservation, till 24th December..; Manoj Jarang's warning to the government | आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, 24 डिसेंबरपर्यंत..; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

Manoj Jarange Jalna Sabha : आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार, आम्ही दंड आणि मांड्या थोपटल्या आहेत, आता तुम्हाला सुट्टी नाही. आरक्षण दिले नाही तर गाठ मराठ्यांशी आहे, असा इशारा मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला. मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांची जालन्यात विराट सभा पार पडली. यावेळी त्यांनी सरकारला इशारा देण्यासोबतच छगन भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल केला. 

...तर गाठ मराठ्यांशी आहे 
राज्य सरकारने कुणा एकट्याच्या दबावाखाली येऊन मराठ्यांशी दगाफकटा केला तर सुट्टी देणार नाही. 70 वर्षांपासून आमच्यावर अन्याय होतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 24 डिसेंबरपर्यंची वेळ आहे, 24 तारखेला सरसकट आरक्षण मिळाले नाही, तर गाठ मराठ्यांशी आहे, असा इशाराही जरांगे यांनी यावेळी सरकारला दिला. 

ओबीसी आरक्षणाचा एका जातीला फायदा
जरांगे पुढे म्हणतात, ओबीसी आरक्षणाचा फक्त एका जातीला फायदा झाला आहे. 2000 ते 2014 या काळात या व्यक्तीने 80 टक्के हिस्सा एकट्याने खाल्ला, इतर 300 जातींना 20 टक्के हिस्सा मिळाला. याला फक्त सभेला धनगर समाज लागतो. आम्ही त्यांना म्हटलं की, धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका जाहीर करा, ते करत नाही. 

भुजबळांवर जहरी टीका
हे सगळ्यात वाया गेलेले मंत्री आहेत. यांच्या सांगण्यावरुनच आमच्या लोकांना अटक केली. हिंगोलीत येऊन गप्पा हाणतो. इकडे येतो आणि जातीवाद करतो. घटनेच्या पदावर बसतो, सरकारसोबत राहतो आणि महापुरुषांच्या जाती काढतो. भारतातला सर्वात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ आहे. जाती-जातीत तेढ निर्माण करणारा, ओबीसी बांधव आणि मराठा बांधवांमध्ये दंगली घडवण्याचे काम करणारा, सगळ्यात वाया गेलेला मंत्री म्हणजे छगन भुजबळ, अशी घणाघाती टीकाही जरांगेंनी यावेळी केली.

दोन दिवसात गुन्हे मागे घ्या
लाठीचार्जवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्या आया बहिणींवर हल्ला झाला. इतके निष्ठूर सरकार आम्ही कधीच पाहिले नाही. एकीकडे म्हणता की आमच्यावरील गुन्हे मागे घेणार, दुसरीकडे आमच्या लोकांना अटक करता. तीन महिन्यानंतर आमच्या लोकांना अटक केली. सरकारला एक शेवटची विनंती आहे, 2 तारखेला उद्या एक महिना पूर्ण होतोय. दोन दिवसांत अंतरवलीतले गुन्हा आणि एक महिन्यात महाराष्ट्रातील मागे घ्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 

Web Title: maratha reservation, manoj jarange, No retreat without reservation, till 24th December..; Manoj Jarang's warning to the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.