मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 12:43 AM2018-02-28T00:43:47+5:302018-02-28T00:44:29+5:30
नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नवनवीन तंत्रज्ञान व यंत्र आधुनिकरणामुळे जागतिकस्तरावर नोक-यांचे प्रमाण कमी होत आहे. तरुणांनी नोकरीच्या मागे न लावता संघटीत होऊन शेतीपूरक व्यवसाय व उद्योगातील संधी शोधून स्वत:च्या पायावर उभे राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनी केले.
स्वयंवर मंगल कार्यालयात मंगळवारी मराठा फाऊंडेशनच्यावतीने शिवजयंतीनिमित्त कृषीपुरक उद्योग व्यवसाय व रोजगार निर्मिती कार्यशाळेचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी कृषिभूषण विजय अण्णा बोराडे होते.
जिल्हाधिकारी जोंधळे म्हणाले की, आपल्या देशात नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जगाच्या तुलनेत शेती, पाणी व हवामान आपल्याकडे चांगलेच आहे. परंतु तरुण याचा फायदा घेतांना दिसत नाही. केवळ नोकरीचा विचार करतात. जागतिक स्तरावरच नोक-यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तेव्हा तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग, व्यवसायाकडे वळावे, दुध, रेशीम, शेळी पालन कुक्कूट पालनासारख्या उद्योग व व्यवसायाकडे वळावे असे आवाहन केले.
प्रा. डॉ. एम.व्ही धुमाळ यांनी कुक्कूटपालन व शेळीपालन व्यवसायातील माहिती दिली. तर रेशीम अधिकारी व्ही.एम.भांगे व प्रा. अजय मिटकरी यांनी रेशीम उद्योगातील शेतकरी महिन्याला लाखो रुपये कसे कमावू शकतो याची माहिती स्वयंरोजगार कार्यशाळेत दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश कव्हळे यांनी केले.यावेळी माजी आ. अरविंदराव चव्हाण, कॉंग्रेसचे नेते भीमराव डोंगरे, आर.आर.खडके, साईनाथ पवार, सजेर्राव बोराडे, राजेंद्र गोरे, धनराज लोंढे पाटील, महेश उफाड, सुनिल अंभोरे, सुभाष कोळकर, रघुनाथ गोल्डे, नारायणराव बोराडे, गजानन वाळके , बबनराव गाडेकर, डॉ. जगन्नाथ खंडागळे, प्रा. डॉ. शिवाजी मदन, ज्ञानेश्वर भांदरगे आदींची उपस्थिती होती.