उद्योगमंत्र्यांचा मॅरेथॉन दुष्काळी दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:58 AM2018-10-16T00:58:29+5:302018-10-16T01:00:48+5:30
पाऊस लांबल्याने यंदा १९७२ पेक्षाही दुष्काळाची दहाकता जास्त आहे, त्यावेळी पाऊन पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. यंदा मात्र शेतक-यांनी लाखो रूपये खर्च करून खरीप हंगामात पेरणी केल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई समोर आपल्या व्यथा मांडल्या. सोमवारी सुभाष देसाई हे जालना तालुक्यातील गोलापांगरी, अंतरवाला तर अंबड तालुक्यातील लालवाडी, शेवगा या गावांना भेटी दिल्या. त्यावेळी दहाक चित्र पाहून देसाई देखील आवाक् झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/गोलापांगरी : पाऊस लांबल्याने यंदा १९७२ पेक्षाही दुष्काळाची दहाकता जास्त आहे, त्यावेळी पाऊन पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. यंदा मात्र शेतक-यांनी लाखो रूपये खर्च करून खरीप हंगामात पेरणी केल्याने मोठे नुकसान झाल्याचे शेतक-यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई समोर आपल्या व्यथा मांडल्या. सोमवारी सुभाष देसाई हे जालना तालुक्यातील गोलापांगरी, अंतरवाला तर अंबड तालुक्यातील लालवाडी, शेवगा या गावांना भेटी दिल्या. त्यावेळी दहाक चित्र पाहून देसाई देखील आवाक् झाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्री मंडळातील मंत्र्यांनी दुष्काळाची स्थिती ही थेट बांधावर जाऊन पाहावी असे निर्देश दिले होते. त्यानुसार आपण दौºयावर आल्याचे सांगितले. सोमवारी सकाळी देसाई हे जालना तालुक्यातील गोलापांगरी येथील पवन रावसाहेब कावळे यांच्या शेतात गेले. तेथे त्यांनी कपाशी तसचे सोयाबीनीच पाहणी केली. यावेळी शेतकºयांनी त्यांना समस्या सांगितल्या. यंदाचा दुष्काळा हा दुहेरी फटका देणारा ठरल्याचे पवन कावळे यांनी सांगितले. यावेळी पेरण्या झाल्यानंतर पावसाने हुलकावणी दिली. त्यामुळे पेरणीचा पूर्ण खर्च वाया गेला. तसेच बोंड अळीने पुन्हा एकदा कपाशीवर हल्ला केल्याने उत्पादन घटणार असल्याचे नमूद केले. यावेळी देसाई व अन्य अधिकारी हे कावळे यांच्या शेतात केवळ चार ते पाच मिनिटे थांबले. परंतु नंतर पुन्हा शेतकºयांनी साहेब ऐकूण तर घ्या असे म्हणत त्यांना थांबविले. यावेळी शेततळे करण्यासाठी जसे अनुदान देण्यात येते, तसेच अनुदान हे प्लास्टिक पन्नी साठी द्यावे जेणेकरून जास्तकाळ शेततळ्यात पाणी साठवून ठेवण्यास मदत होईल असे सागिंतले.
यावेळी आंतरवाला येथेही सुभाष देसाई यांनी थेट शेतात जाऊन शेतकºयांशी संवाद साधला. येथेही तशीच स्थिती असल्याची माहिती शेतकºयांनी दिली. कर्जमाफीचा लाभ मिळाला असला तरी, आता पूर्ण कर्जमाफी करण्याची गरज व्यक्त केली. अंबड तालुक्यातील लालवाडी येथील राधाबाई बगारे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. तर शेवगा येथील अशोक सराळे यांच्या शेतात जाऊन शेतकºयांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी कपाशीचे उत्पादनही यंदा थेट ५० टक्के घटणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अपुºया पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद तसेच बाजरीचे मोठे नुकसान झाल्याचे शेतकºयांनी देसाई यांच्या लक्षात आणून दिले.
जालना : अधिकारी, कर्मचाºयांनी संवेदनशील रहावे : देसाई
चार गावांचा दौरा केल्यानंतर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. बोंड अळीचे अनुदानाचे दोन टप्पे आले असून, ते शेतकºयांना वाटप केले असल्याचे सांगून अद्याप ९० कोटी रूपये येणे शिल्लक असल्याचे सांगितले. तसेच चारा टंचाई जाणवू नये म्हणून जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात चारा विक्री बंदी केली असल्याचे सांगितले. जवळपास ८५० कोटी रूपयांचे पीककर्ज वाटप करण्यात आल्याचे सांगितले. यावेळी देसाई यांनी अधिकाºयांनी या गंभीर परिस्थिती संवेदनशील राहावे असे सांगून थोडे नियम शिथील ठेवण्याचे निर्देश दिले. प्लास्टिक पन्नसाठीच्या अनुदानासाठी आपण मंत्री मंंडळात आग्रह धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
निकष जुनेच
दुष्काळाची दाहकता मोठी असताना जिल्हा प्रशासनाने बागायती शेतकºयांसाठी देखील कोरडवाहूचे निकष लावले असल्याचा मुद्दा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी लक्षात आणून त्यात जुनेच निकष लावल्याने शेतकºयांना मिळणारी मदत ही कमी मिळत असल्याचा मुद्दा अंबेकरांनी लक्षात आणून, त्या बाबतही पुर्नविचवार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मंठा तालुक्याचा समावेश व्हावा
दुष्काळसदृश्य परिस्थितीमुळे मंठा तालुक्यातही भयावह स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाही राज्य सरकारने जाहीर केलेल्या १७२ दुष्काळी तालुक्यांमध्ये मंठा तालुक्याचा समावेश नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे यांनी हा मुद्दा लक्षात आणून दिला. त्यावेळी याकडे आपण मंत्रिमंडळाच्या होणाºया बैठकीत चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यासोबतच याबद्दल चर्चा करण्यात येईल, असे देसाई यांनी सांगितले.
वीजेचा प्रश्न गंभीर
अचानक सुरू झालेले भारनिमयन तसेच स्ट्रांन्सफार्मर जळाल्यानंतर त्यासाठी पैसे घेतल्या शिवाय ते मिळत नसल्याचा गंभीर आरोप माजी आ. शिवाजी चोथे यांनी केला. यावेळी अधीक्ष अभियंता अशोक हुमणे यांनी खुलास करण्याचे निर्देश दिल्यावर हुमणे म्हणाले की, आॅईल नसल्याने स्ट्रांन्सफार्मची दुरूस्ती रखडल्याचे मान्य केले. तसेच आता उरण येथून हे आॅईल मागविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वीजपुरवठा न तोडण्याच्या सूचना यापूर्वीच राज्य शासनाकडून प्राप्त असल्याचे हुमणे म्हणाले.