महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 01:11 AM2019-02-20T01:11:27+5:302019-02-20T01:12:10+5:30

महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले.

Marathwada progress on women enabled- Borade | महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

महिला सक्षम झाल्यासच मराठवाड्याची प्रगती -बोराडे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : मराठवाड्यातील जनता ही खूपच संयमी आणि प्रचंड मेहनत करणारी आहे, त्यातले त्यात मराठवाड्यातील पुरूष मंडळी जास्तीच्या राजकारणाात गुंतल्यामुळे शेतीची जास्तीत - जास्त कामे या महिला करत आहे . या महिलांना आपण केवळ शेतीत गुंतवून न ठेवता त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे असे प्रतिपादन कृषीभूषण विजय अण्णा बोराडे यांनी केले. ते सोमवारी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात आयोजित व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमात बोलत होते.
मराठा क्रांती मोर्चा प्रणित शिवजन्मोत्सव समितीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सोमवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त व्हीजन मराठवाडा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचा शुभारंभ कृषीभूषण बोराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आ.विनायक मेटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजेश टोपे, डॉ.संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, अंकुश राउत, शेख महेमूद, सिध्दीविनायक मुळे, बी एम दानवे, गणेश सुपारकर, संतोष गाजरे आदींची उपस्थिती होती. यावेळी आ.विनायक मेटे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
आ.राजेश टोपे, डॉ. संजय लाखे पाटील, अ‍ॅड. दिलीप तौर, यांनी सविस्तर मते मांडून मराठवाड्याच्या विकासासाठी संघर्ष करण्यासह योजना कशा आणता येतील यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक जगन्नाथ काकडे यांनी केले. अशोक पडूळ यांनी सूत्रसंचालन केले तर अरविंद देशमूख यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वाढेकर, नरसिंग पवार ,रमेश गजर, दिलीप तळेकर, दत्ता शिंदे, कृष्णा पडूळ, गणेश पडूळ, कचरे, आकात थेंगडे, शुभम टेकाळे, सचिन कचरे, भुतेकर, कृष्णा क्षीरसागर, दिलीप भिसे, अ‍ॅड. लक्ष्मण उढाण आदींनी प्रयत्न केले.

Web Title: Marathwada progress on women enabled- Borade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.