बनावट डिग्री प्रमाणपत्र दाखवून लावले लग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:27 AM2021-04-12T04:27:39+5:302021-04-12T04:27:39+5:30
जालना : बनावट व खोटे डिग्री प्रमाणपत्र दाखवून लग्न लावले. त्यानंतर सासरच्यांनी हुंड्याच्या पैशांची मागणी करून २७ वर्षीय ...
जालना : बनावट व खोटे डिग्री प्रमाणपत्र दाखवून लग्न लावले. त्यानंतर सासरच्यांनी हुंड्याच्या पैशांची मागणी करून २७ वर्षीय महिलेचा मानसिक छळ केल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा बावडा येथे घडली. याप्रकरणी सासरच्यांकडील पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जालना येथील तरलेचा रसिका पाटील यांचे कोल्हापूर येथील प्रणित प्रकाश पाटील याच्याशी लग्न झाले होते. लग्न जुळण्याच्या वेळी प्रणित पाटील व त्याच्या आई-वडिलांनी बनावट व खोटे डिग्री प्रमाणपत्र दाखवून लग्न उरकून घेतले. त्यानंतर माहेरच्यांकडून हुंड्याचे पैसे घेऊन ये असे म्हणून रसिका पाटील यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. त्यानंतर रसिका पाटील यांना माहेरी काढून देण्यात आले. या प्रकरणी विवाहित महिला रसिका प्रणित पाटील यांच्या फिर्यादीवरून पती प्रणित प्रकाश पाटील, सासू ज्योत्सना प्रकाश पाटील, सासरा प्रकाश कलगोंडा पाटील, नणंद प्रीती व हर्षवर्धन इंगळे (सर्व रा. कसबा बावडा ता. जि. कोल्हापूर) व मामा सासरा जॉर्ज (रा. पीपल्स बँक कॉलनी जालना) यांच्याविरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. तपास मसपोनि सानप हे करीत आहेत.