मास्कने लिपस्टिकची लाली घालविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:22 AM2021-04-29T04:22:34+5:302021-04-29T04:22:34+5:30
महिला आणि सौंदर्य हे समीकरण जुनेच आहे. त्यातच आता महिलाही पुरुषांच्या बरोबरीने बाहेरील जगात वावरत आहेत. त्यामुळे चांगली पर्सनॅलिटीला ...
महिला आणि सौंदर्य हे समीकरण जुनेच आहे. त्यातच आता महिलाही पुरुषांच्या बरोबरीने बाहेरील जगात वावरत आहेत. त्यामुळे चांगली पर्सनॅलिटीला अनन्य साधारण महत्त्व आले आहे. त्यामुळे शहरातील गल्लोगल्ली ब्युटीपार्लर थाटलेले आहेत, परंतु गेल्या महिन्याभरापासून हे पार्लर बंद असल्याने, त्याचा मोठा फटका सौंदर्य प्रसाधनांचे घाऊक विक्रेत्यांनाही बसल्याचे सांगण्यात आले. पुढील काही आठवड्यात ही पार्लर सुरू न झाल्यास आणखी मोठा फटका बसू शकतो.
चौकट
पार्लर बंदचा मोठा फटका
गेल्या सात वर्षापासून आपण घरातच ब्युटी पार्लर चालवितो. त्यातून कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी याचा मोठा लाभ होतो, परंतु गेल्या वर्षभरापासून कोरानाचे संकट उभे राहिले आहे. त्यातच हे पार्लर कधी बंद तर कधी सुरू असे चित्र असल्याने मोठा तोटा सहन करावा लागत आहे.
आरती तिडके, जालना, पार्लर चालक
-----------------------------------------------------
घडी विस्कटली
कोरोनाचे कारण देत पार्लर बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे नेहमी येणाऱ्या महिलांचा खंड पडत असल्याने, ग्राहकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. केवळ सुंदर दिसण्यासाठीच पार्लरमध्ये महिला येतात असे नाही. त्यातून आरोग्य संवर्धनही होते. त्यामुळे किमान घरगुती पार्लर बंद करू नयेत.
मथूर पालके, जालना, पार्लर चालक
----------------------------------------
फॅशन काळाची गरज
आज अनेक समारंभ, तसेच नोकरीच्या ठिकाणी जातांना तुमची पर्सनॅलिटी खूप महत्त्वाची ठरते. केवळ तुम्ही साधे-सरळ गेलात तुमचा पाहिजे, तेवढा प्रभाव पडत नाही. त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये जाऊन तुमच्या सौंदर्यांत आणखी भर घालता येते. त्यामुळे हा व्यवसाय बंद न ठेवणे हाच एक पर्याय आहे.
मिता आपसिंगेकर, जालना
-------------------------------------------------------
पार्लरचा मेकअप सवयीचा भाग
गेल्या अनेक वर्षांपासून आपण नियमितपणे पार्लरमध्ये जातो. ते केवळ सुंदर दिसण्यासाठीच नाही, तर चांगले राहण्याने तुमचे व्यक्तिमत्त्व फुलते, त्यामुळे ऐन लग्नसराईत पार्लर बंद राहिल्याने आमचा मोठा हिरमोड झाला आहे. त्यामुळे या मुद्द्यावर सरकारने नव्याने विचार करावा.
वर्षा चव्हाण, जालना
--------------------------------------------------------
कॉस्मॅटिकचा बाजार ठप्प
कॉस्मॅटिकचा बाजार केवळ महिलांसाठीचा आहे, हा समज आता गौण ठरत आहे. महिलांप्रमाणेच पुरुष मंडळीही स्वत:च्या सुंदरतेकडे अधिक लक्ष देत आहे. त्यामुळे लिपस्टिक आणि अन्य लोशन या महिलाचा वापरतात, परंतु हेअरडाय, तसेच अन्य फेसवॉश, मसाजचे साहित्य हे पुरुष मंडळीही मोठ्या प्रमाणावर करतात. असे असतानाच कोरोनाचा मोठा फटका कॉस्मॅटिक बाजाराला बसला आहे.
बलराम राजनकर, कॉस्मॅटिक साहित्याचे घाऊक विक्रेते, जालना