जालन्यात एमआयडीसीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ३४ कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 16:24 IST2024-08-24T16:23:43+5:302024-08-24T16:24:29+5:30
एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

जालन्यात एमआयडीसीतील स्टील कंपनीत भीषण स्फोट, ३४ कामगार जखमी
जालना: जालन्यातील एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन कंपनीत आज दुपारी भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यात ३४ कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे अधिक उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.
एमआयडीसीमधील एका स्टील उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या भट्टीमध्ये स्फोट झाल्याची माहिती आहे. यावेळी भट्टीजवळ काम करत असलेली ३४ कामगार होरपळून जखमी झाले. सर्व जखमींना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील सात कामगारांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.
जालना देशभरात स्टीलसाठी प्रसिद्ध
देशभरात जालना शहर स्टील उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक कंपन्यां स्टील उत्पादन करतात. यासाठी बाहेरच्या राज्यातील कामगार मोठ्या प्रमाणावर कामाला आहेत. या कंपन्यांत मुख्यतः भट्टीमध्ये लोखंड वितळवले जाते. या प्रक्रिये दरम्यान यापूर्वी देखील अनेकदा स्फोट झाले आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक कामगारांनी जीव गमावला तर अनेकांना अपंगत्व देखील आलेले आहे.
( सविस्तर वृत्त लवकरच)