Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 11:22 PM2022-11-08T23:22:00+5:302022-11-08T23:23:17+5:30

आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते.

Massive fire in Rajuri Steel in Jalanya, fire brigade rush | Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

Video : जालन्यातील राजुरी स्टीलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाची धाव

Next

जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत असलेल्या राजुरी स्टीलच्या वर्कशाॅपसह अन्य भागात मंगळवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान मोठी आग लागली. ही आग विजेच्या ट्राॅन्सफार्मरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लागली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

आग लागल्याची माहिती तातडीने येथील अग्निशमन दलाला देण्यात आली. यावेळी अग्निशमन दलाचे दोन बंब राजुरी स्टील परिसरात आग विझविण्यासाठी दाखल झाले होते. ही आग भयंकर असल्याने ती अटोक्यात आणताना अग्निशमन दलातील जवानांची मोठी कसरत झाली. ही आग रात्री ११ वाजतानंतरही सुरू होती. या आगातील कोणी जखमी आहे काय किंवा जीवितहानी झाली आहे काय, याबद्दल रात्री कुठलाच दुजोरा मिळू शकला नाही. आग विझविण्यासाठी पाण्याचे खासगी टँकरही मागविण्यात आले. परिसरातील नागरिक, कंपनीतील कामगारांनीदेखील आग नियंत्रणात आणण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले.


 

Web Title: Massive fire in Rajuri Steel in Jalanya, fire brigade rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.