प.पू. गुरु गणेशलालजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 01:18 AM2020-01-23T01:18:10+5:302020-01-23T01:18:49+5:30
कर्नाटक गजकेशरी प. पू. गणेशलालजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कर्नाटक गजकेशरी प. पू. गणेशलालजी महाराजांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तपोभूमीत दररोज सकाळी ९ ते १० या वेळेत प्रवचन होणार असून, दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
प. पू. गणेशलालजी महाराजांचे भक्तगण संपूर्ण देशभर आहेत. त्या निमित्ताने भाविकांची मोठी गर्दी होणार असून, त्याचे सर्व ते नियोजन केले आहे.
प.पू. विवेकमुनिजी म.सा., प.पू. श्रुतमुनिजी म.सा., प.पू. सौरभमुनिजी म.सा., प.पू. गौरवमुनिजी म.सा., प.पू. अक्षरमुनिजी, प.पू. प्रणवमुनिजी म.सा., दीपिका, दिलीपकंवरजी म.सा., प.पू. सुशीलकंवरजी म.सा., प.पू. किरणसुधाजी, प.पू. प्रशांतकंवरजी म.सा., प. पू. कुसुमकंवरजी म.सा., प.पू. भक्तीप्रभाजी म.सा. आदींची उपस्थिती राहणार आहे.
बुधवारी सामूहिक तेला दिवस, सहजोडे गुरु गणेश साधना, गुरुवारी सकाळी प्रभातफेरी आणि सामूहिक सामायिक दिवस, शुक्रवारी पुण्यतिथीचा मुख्य सोहळा आहे. या निमित्त सकाळी ६ वाजता प्रार्थना, साडेआठ वाजता ध्वज वंदन, तर पावणे नऊ वाजता रक्तदान शिबीर होणार असून, गुरु गणेश गुणगान सभेला प्रारंभ होणार आहे. या पुण्यतिथी समारोहातील कार्यक्रमास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघपती कचरूलाल लुणिया, अध्यक्ष सुदेशकुमार सकलेचा, महामंत्री डॉ. धरमचंद गादिया यांच्यासह श्रावक संघाच्या सर्व विश्वस्त मंडळाने केले आहे.