मत्स्योदरीची ‘टीम व्हेलर’ एआयआरसीमध्ये अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 12:30 AM2020-02-27T00:30:18+5:302020-02-27T00:30:57+5:30
रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : देखणे डिझाईन, दोन स्पार्क प्लग असलेले १२५ सीसीचे इंजिन आणि तासाला ८० किलोमीटर्सचा वेग असे फीचर्स असलेली रेसिंग कार सध्या युवकांचे आकर्षण ठरले आहे. एखाद्या नामांकित कंपनीच्या रेसिंग कारच्या तोडीस तोड अशी फॉमु$र्ला वन रेसिंग कार मत्स्योदरी शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञानमहाविद्यालयाच्या ‘टीम व्हेलर’ने तयार केली आहे. या कारने नुकत्याच पुणे येथे झालेल्या एआयआरसी या राष्ट्रीय स्पर्धेत अकरावा क्रमांक पटकावला आहे.
विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी अगोदर या कारचे डिझाईन तयार केले. त्यानंतर त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक स्पेअर पार्टची निर्मिती केली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षणासाठी व अनुभवासाठी अशा प्रकारच्या विविध नाविन्यपूर्ण यंत्रांची निर्मिती करावी लागते. याचाच एक भाग म्हणून मत्स्योदरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या विद्यार्थ्यांनी रेसिंग कार (गो-कार्ट) तयार करण्याचे ध्येय समोर ठेवले होते. सलग तीन महिने अथक परिश्रम घेऊन व स्पर्धेच्या सर्व अटींची पूर्तता करून ही अनोखी रेसिंग कार साकारली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आरोग्यमंत्री राजेश टोपे, सचिव मनीषा टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, प्राचार्य डॉ. एस. के. बिरादार आदींनी कौतुक केले.
६० संघांतून ११ क्रमांक
पुणे येथील डी. वाय. पाटील अभियंत्रिकी महाविद्यालयात झालेल्या आॅटो इंडिया रेसिंग चॅम्पियनशिप (ए. आय. आर. सी) या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेमध्ये या कारने ६० संघामधून अकरावा क्रमांक पटकावला.
संघप्रमुख चेतन जोशी, उपप्रमुख अभिषेक जोहरे, गाडीचालक राजेश अग्रवाल, काकासाहेब कान्हेरे, विजय पवार, सुनील लहाने, अभिषेक शर्मा, विकी तोडावत, कृष्णा कान्हेरे, सुदर्शन जाधव, धीरज भंडे, कृष्णा झिरमिरे, मोहसीन पठाण, कांचन कुलकर्णी, प्रणाली इंगळे, प्रीती गरकळ, नीलेश ठोंबरे, कृष्णा धांडे, वैभव गायकवाड, सचिन चव्हाण तसेच प्राध्यापक मार्गदर्शक प्रा. प्रफुल्ल ठाकरे आदींनी ही गाडी साकारली आहे.