एमबीबीएस महाविद्यालय : ना जनतेचा रेटा ना लोकप्रतिनधींचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:30 AM2021-09-19T04:30:55+5:302021-09-19T04:30:55+5:30

या उलट जालन्यातील स्थिती आहे. नऊ महिन्यांचा कालावधी तसा खूप मोठा म्हणावा लागेल. जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी यात ...

MBBS College: Neither the rate of the people nor the pursuit of the people's representatives | एमबीबीएस महाविद्यालय : ना जनतेचा रेटा ना लोकप्रतिनधींचा पाठपुरावा

एमबीबीएस महाविद्यालय : ना जनतेचा रेटा ना लोकप्रतिनधींचा पाठपुरावा

Next

या उलट जालन्यातील स्थिती आहे. नऊ महिन्यांचा कालावधी तसा खूप मोठा म्हणावा लागेल. जालन्याचे आ. कैलास गोरंट्याल यांनी यात पुढाकार घेऊन जालन्यात एमबीबीएस महाविद्यालय व्हावे म्हणून जंग पछाडले होते. त्यांच्या आग्रहाखातर अमित देशमुख यांनी जालन्याचा दौरा करून जागेची पाहणी केली होती. तसेच आढावा बैठक घेऊन तातडीने हा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार करून तो शासनाकडे पाठवावा अशा सूचना दिल्या होत्या; परंतु त्या केवळ कागदावरच राहिल्या आहेत. परभणी येथील एमबीबीएस महाविद्यालयासाठी केवळ एक-दीड वर्षात सर्वकाही गतीने होऊन ते मार्गी लागले. ज्याप्रमाणे येथील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्याने हे शक्य झाले, तशी अवस्था जालन्यात नाही.

चौकट

नागरिकांचेही चलता है....

जालन्यातील नागरिक किती सहनशील आहेत हे नव्याने सांगण्याची गरज नाही. पंधरा-पंधरा दिवस पाणीपुरवठा होत नव्हता, त्यावेळीही एकही मोर्चा निघाला नाही. आजही नागरी समस्यांबाबत निवेदन देण्याचे सोपस्कार पूर्ण करून गप्प बसणेच पसंद करतात. खासगीत सर्वपक्षीय नेत्यांविरूध्द मनाला येईल ते बोलतात; परंतु या समस्या सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरत नाहीत. त्यामुळे नेत्यांवरही त्याचा परिणाम होत नाही. याच धर्तीवर एमबीबीएस महाविद्यालयाचे झाले आहे. ना लोकप्रतिनधींनी यासाठी चोटीचा जोर लावला ना जनतेने... त्यामुळे अद्याप याचा साधा प्रस्तावही तयार होऊ शकला नाही.

चौकट

श्रेय मिळेल म्हणून पुढाकार नाही...

जालन्यात एमबीबीएस महाविद्यालय यावे म्हणून आ. कैलास गोरंट्याल यांनी पुढाकार घेतला. त्यांनी अमित देशमुखांशी संपर्क करून दौरा निश्चित करून जागेची पाहणी केली; परंतु नंतर यात पक्षीय राजकारण आल्याचे दिसून येत आहे. हे महाविद्यालय जालन्यात आल्यास त्याचे श्रेय हे आमदार गोरंट्याल यांनाच मिळणार हे वास्तव आहे. त्यामुळे अन्य राजकीय पक्षातील नेत्यांनी यात न पडलेलेच बरे अशी भूमिका घेतल्याने हे जालन्यासाठी वरदान ठरणारे महाविद्यालय लांबणीवर पडले आहे. हे येथे झाल्यास गारेगरिबांना अनेक महत्त्वाच्या आजारांवरील शस्त्रक्रिया अत्यंत कमी खर्चात होऊन माेठी मदत होऊन एक मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल होऊ शकते.

चौकट

मनोरुग्णालय जिल्हा रुग्णालयातच

जालन्यात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या पुढाकारातून प्रादेशिक मनोरुग्णालय होऊ घातले असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. हे रुग्णालय सध्या तात्पुरत्या पातळीवर जिल्हा रुग्णालयातील एका इमारतीत सुरू करण्यासाठी जागा निश्चित झाली आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी नुकतीच या इमारतीची पाहणी केली. हे मनोरुग्णालय ३६५ खाटांचे आहे. त्यासाठी जवळपास शंभर कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Web Title: MBBS College: Neither the rate of the people nor the pursuit of the people's representatives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.