वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:30 AM2019-07-26T00:30:49+5:302019-07-26T00:31:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने ...

Medicine is a reality - | वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

वास्तविकतेसाठी चिकित्सा महत्त्वाची - आ.ह. साळुंके

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कुठल्याही सांगीव अथवा सिद्ध न होणाऱ्या गोष्टींवर विश्वास न ठेवता जो पर्यंत चिकित्सक पध्दतीने स्वत: अनुभव घेत नाही, तो पर्यत ती गोष्ट सत्य आहे, असे मानू नये असे हजारो वर्षापूर्वी भगवान गौतम बुध्दांनी सांगितले आहे. विज्ञानही तेच सांगते, असे प्रतिपादन प्रसिध्द विचारवंत तथा साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंके यांनी केले. गुरुवारी त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गौरव सोहळ्याला उत्तर देताना केले.
जालना येथील आ.ह. साळुंके अमृत महोत्सवी सत्कार समितीकडून या सोहळ्याचे आयोजन मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री डॉ. शंकरराव राख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उस्मानाबाद येथील प्रा. अर्जुन जाधव यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. साळुंके म्हणाले की, जालन्याचा आणि माझा संबंध हा फार जुना आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त मी जालन्यात आलो असल्याचे ते म्हणाले. भारतीय संस्कृती, तसेच त्यातील विविधता, विविध धर्म, जातींच्या परंपरा या दोष नसून, ते एक वैभव आहे. त्यामुळेच आपण एकसंघ आहोत. या वेगवेगळ्या परंपरा म्हणजे निसर्गातील विविध रंगांची फुले असल्याचे सांगून त्यांनी याचे महत्त्व विशद केले.
भगवान गौतम बुध्द, रवींद्रनाथ टोगोर, चार्वाक, महात्मा बसवेश्वर तसेच संत तुकाराम महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींच्या प्रेरणेतून गुलामगिरीला नख लावण्याचे काम झाले आहे. संत तुकारामांनी जो विद्रोह केला, त्याचा प्रचार केला जात नसून, त्यांचे चमत्कार सांगितले जात असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.
प्रतिकूल परिस्थितीत हताश न होता, त्याकडे एक संधी म्हणून पाहण्याची गरज त्यांनी सांगितली. चिकित्सेला महत्त्व देण्याचे आवाहन त्यांनी केले.

वेगवेगळे मतप्रवाह : वाद गुण्या-गोविंदानेच सुटू शकतात
देशात आज अनेक मुद्यांवरून वेगवेगळे मतप्रवाह आहेत. संवाद दुरावत चालला असून, जाती-धर्माच्या नावावर विभागणी होत आहे. या बद्दल आपण १९९० मध्ये एका पुस्तकातून प्रकाश टाकला होता. आज हिंदू आणि मुस्लिमांचे जे वाद आहेत, ते गुण्या गोविंदाने एकत्रित बसूनच सुटू शकतात.
कोणीच कोणाला हाकलून देऊन अथवा संहार करून हा प्रश्न न मिटणारा आहे. हल्ली संवादांपेक्षा व्देषाचे राजकारण सुरू असल्याने चिंतेत वाढच होत आहे. हे कुठे तरी थांबवण्यासाठी सर्वंनी एकत्र येऊन विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. धर्म आणि जातीच्या नावावरील तेढ न शोभणारी आहे.

तरूण पिढी भरकटलेली नाही
आजची तरूण पिढी भरकटलेली आहे, असा जो समज पसरवण्यात येत आहे, ते आपल्याला मान्य नाही. आज अनेक युवक-युवती हे चांगले काम करून सत्य आणि वास्तवाची कास धरताना दिसतात. चळवळींच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या चालीरीतींवर आसूड ओढताना दिसत आहेत. त्यामुळे तरुणांना दिशा देण्यासाठी ज्येष्ठांनी पुढाकार घेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Medicine is a reality -

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.