ओबीसी समाजाचा मोर्चा यशस्वी करण्याचा बैठकीत निर्धार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:22+5:302021-01-16T04:35:22+5:30
जालना : येत्या २४ जानेवारी रोजी जालना येथे काढण्यात येणारा ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार लाड गवळी ...
जालना : येत्या २४ जानेवारी रोजी जालना येथे काढण्यात येणारा ओबीसी समाजाचा विशाल मोर्चा यशस्वी करण्याचा निर्धार लाड गवळी व कैकाडी समाजाच्या बैठकीत करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यासह भारतातील संपूर्ण ओबीसी समाजाची जनगणना करण्यात यावी, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जालना येथे २४ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी लाड गवळी समाजाची बैठक जुना जालना भागातील गवळी मोहल्ला येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस ओबीसी मोर्चाचे संयोजक राजेंद्र राख, अशोक पांगारकर, संजय काळबांडे, लाड गवळी समाजाचे ज्येष्ठ नेते बाबुराव सतकर, लक्ष्मण सुपारकर, जिल्हाध्यक्ष गणेश सुपारकर, विठ्ठल अवघड, सुहास मुंढे, संतोष जमधडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीच्या प्रारंभी लाड गवळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश सुपारकर यांनी ओबीसी मोर्चा पाठीमागील पार्श्वभूमी विशद करून, सदर मोर्चात गवळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याची आवाहन केले. त्यानंतर, बाबुराव सतकर, राजेंद्र राख, संजय काळबांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या बैठकीस लाड गवळी समाजातील समाज बांधव, युवक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी संजय गायकवाड, संजय जाधव, अंकुश गायकवाड, राजू पवार, अरुण पवार, अशोक गायकवाड, रामलाल जाधव, दीपक जाधव यांच्यासह समाजातील पदाधिकारी, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.