‘समृद्धी’च्या भूसंपादनाबाबत मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:26 AM2018-01-11T00:26:51+5:302018-01-11T00:26:54+5:30
नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेमध्ये जाणा-या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांतील भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नागपूर-मुंबई समृद्धी एक्स्प्रेस वेमध्ये जाणा-या औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही गावांतील भूसंपादनाबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी बुधवारी मंत्रालयात राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी बैठक घेतली.
जामवाडी, गुंडेवाडी, निधोना व औरंगाबाद तालुक्यातील पळशी येथील शेतक-यांच्या भूसंपादनाबाबतच्या अडचणी व समस्यांवर चर्चा झाली. याप्रसंगी रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेशाम मोपलवार, कुरुंदकर, बालाजी खतगावकर, पवार, युवासेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, नानासाहेब पळसकर, रामेश्वर पळसकर, राजेश खडके, संजय वाढेकर, काशीनाथ क्षीरसागर, सुभाष वाढेकर, शिवाजी वाढेकर, अंबादास घोडके, दामोदर शेळके उपस्थित होते.