व्यापाऱ्याचे घर फोडून साडेतीन लाखांचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:37 AM2019-02-05T00:37:56+5:302019-02-05T00:38:13+5:30
व्यंकटेशनगर येथील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील व्यंकटेशनगर येथील एका घरात चोरट्यांनी डल्ला मारत सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम लंपास केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी सोमवारी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
व्यंकटेशनगर येथील संजय नंदकिशोर जैस्वाल (५५) हे परिवारासह नातलगाच्या अत्यंविधीसाठी रविवारी औरंगाबाद येथे गेले होते. त्यांनी घराच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक होता. परंतू, चोरट्यांनी घराच्या मागील भिंतीवरुन चढून चाईनल गेटचे व दरवाज्याचे कुलूप तोडून अलमारी मधील सोन्याचे दागिने व ८ हजार रुपये रोख रक्कम चोरुन नेली. दरम्यान, रविवारी सकाळी मोलकरीन कामासाठी आली असता, तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले. तिने याची माहिती घरमालकाला दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
दरम्यान, चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यासह ८ हजार रोख रक्कम ३ लाख ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी संजय जैस्वाल यांच्या फिर्यादीवरुन सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउपनि. रुपेकर करीत आहे.