मार्चच्या पहिल्याच आठवड्यात जालन्याचा पारा ३५ अंशावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:29 AM2021-03-06T04:29:39+5:302021-03-06T04:29:39+5:30
दुसरीकडे आयुक्तांच्या सूचनांनुसार सर्दी, खोकल्याची औषधी ही प्रिस्क्रिप्शनशिवाय न देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सहजासहजी मिळणारी औषधी घेण्यासाठीदेखील ...
दुसरीकडे आयुक्तांच्या सूचनांनुसार सर्दी, खोकल्याची औषधी ही प्रिस्क्रिप्शनशिवाय न देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सहजासहजी मिळणारी औषधी घेण्यासाठीदेखील डॉक्टरांकडे जावे लागत आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये साधारणपणे दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान कडाक्याचे ऊन जाणवत आहे. त्यामुळे या वेळेत रस्त्यावरील गर्दीवर परिणाम झाला आहे. पांढरे गमछे तसेच गॉगल्स आणि टोप्यांची मागणी वाढल्याचे दिसून आले. कोरोना व उन्हापासून बचावासाठी नागरिकांना तोंडाला मास्क, डोक्यावर टोपी आणि डोळ्यांना चष्मा, अशा पद्धतीने विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे.
चौकट
तूप खाल्ले की रूप
कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेक जण थंडपेय, तसेच उसाचा रस घेत आहेत; परंतु यात रस थंड राहावा म्हणून बर्फाचा वापर वाढला आहे. यामुळे अनेकांना घशात खवखव होण्याचे प्रमाण वाढले आहे. उष्णतेमुळे थंड घेतल्यावर लगेचच त्याचे रूपांतर सर्दीत होत आहे. कोरोना काळात ताक, तसेच काढा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तूप खाल्ले की, रूप येत असल्याचा प्रत्यय येथे येत आहे.